तिच्याविषयी आम्हाला प्रेम मात्र त्या प्रकरणात तिचा संबंध काय? संजय राऊतांच्या क्रांती रेडकरला प्रश्न

0 256
नवी मुंबई –   एनसीबी (NCB) चे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या पथकाने छापा टाकून मुंबई मधील क्रुझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Party) समोर आणला होता.त्यानंतर त्याच्यावरच या कारवाईत पंच असलेल्या प्रभाकर साईल (Prabhakar Sail) ने लाचखोरीचा आरोप केला होता.  समीर वानखडे यांच्यावर होत असलेल्या आरोपावरून त्यांची पत्नी मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर (Actress Kranti Redkar) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) याना एक पत्र लिहून न्याय द्या अशी मागणी केली होती. (We love her, but what about her in that case? Question to Sanjay Raut’s Kranti Redkar)
या प्रकरणात आता शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकारांशी बोलताना समीर वानखडे आणि क्रांती रेडकरवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. क्रांती रेडकर मराठी मुलगी आहे. तिच्याविषयी आम्हाला प्रेम आहे. पण एनसीबी प्रकरणात क्रांती रेडकरचा संबंध काय? असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी यावेळी  विचारला आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की एनसीबी प्रकरणात क्रांती रेडकर चा संबंध काय? ही लढाई एनसीबी आणि इतर अशी सुरू आहे. क्रांती रेडकरवर व्यक्तिगत कुणी टीका टीपण्णी केलीय असं मला वाटत नाही. मी तसं पाहिलं नाही. महाराष्ट्रात ईडी, सीबीआय, एनसीबीचे अधिकारी बाहेरून येऊन इथं आमच्या मराठी लोकांना त्रास देत आहेत. त्रास देण्यात येणारे लोक मराठीच आहेत ना. ते काय अमराठी आहेत का?
Related Posts
1 of 1,640
संजय राऊत पुढे म्हणाले की  दिल्लीतून तपास यंत्रणांचं आक्रमण सुरू आहे. कारण नसताना मानगुटीवर बसण्याचा प्रयत्न होतोय. अनेक खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. धाडी पडत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर देगलूरला धाडी पडल्यात. अशोक चव्हाण, अजित पवारांचे नातेवाईक मराठी नाहीत का? इथं मराठी तर सगळेच आहेत, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. प्रश्न मराठी अमराठी असण्याचा नाही, सत्य असत्याचा आहे. क्रांतीवर अन्याय होणार नाही. पण केंद्राच्या यंत्रणा राज्यात ज्या प्रकारे मागे लागल्यात व त्यानंतर आता ज्या गोष्टी समोर आल्यात त्यामुळे सगळ्यांना घाम फुटायला लागलाय.

क्रांती रेडकर विषयी आम्हाला प्रेम आहे. ती मराठी मुलगी आहे. तिच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. बाळासाहेब ठाकरे जरी आज नसले तरी उद्धव ठाकरे आहेत. शिवसेना तिच बाळासाहेबांच्या विचाराची आहे. हे ठाकरे सरकार आहे. शरद पवारही आहेत. सर्व व्यवस्थित आहे. इथं कुणावरही अन्याय होणार नाही, असंही संजय राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितले. (We love her, but what about her in that case? Question to Sanjay Raut’s Kranti Redkar)

हे पण पहा – येसवडी गावातील अनाधिकृत हातभट्टी आणि दारु विक्रीवर कारवाई व्हावी

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: