विवाहित महिला सोबत प्रेमसंबंध: MMS बनवून केला ब्लॅकमेल; अन् त्यानंतर..

भोपाळ – विवाहित महिलेसोबत(Married women) प्रेमसंबंध निर्माण करून तिचे शोषण करून अश्लिल फोटो, व्हिडिओ आणि एमएमएस (MMS) तयार करून त्याच्याकडून एक कोटी रुपयांहून अधिकची रक्कम उकळल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) जबलपूरमध्ये (Jabalpur) घडली आहे. या प्रकरणात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीष श्रीवास्तव असे आरोपीचे नाव आहे. (Love affair with a married woman: blackmailed by making MMS; After that ..)
मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने मनीषने छिंडवाडामध्ये राहणाऱ्या विवाहित महिलेसोबत मैत्री केली त्यानंतर तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि महिलेचे शारीरिक शोषण केले. तसेच महिलेचे अश्लिल व्हिडीओ आणि एमएमएसही तयार केले. जेव्हा आरोपीला वाटले की अश्लिल व्हिडीओ आणि एमएमएस पुरेसे आहेत, तेव्हा त्याने सदर महिलेला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्यास सुरुवात केली. एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम दिल्यानंतर जेव्हा महिलेने अजून पैसे देण्यास नकार दिला तेव्हा आरोपीने भोपाळमध्ये राहणाऱ्या आपल्या कुलभूषण नावाच्या मित्राशी संपर्क साधला. कुलभूषणने आपण आयबीचा अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच सदर महिलेच्या पतीला आश्लिल व्हिडीओ आणि एमएमएस दाखवण्याची धमकी दिली. असे करून त्यांनी महिलेकडून सुमारे एक कोटी ३० लाख रुपये उकळले.