हे बघा हे पठ्ठे, येथे बिनमास्कचे फिरत आहेत… – अजित पवार

0 9

अहमदनगर –  अहमदनगर जिल्ह्यामधील  राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार  हस्ते करण्यात आला. या  कार्यक्रमात मास्क नसलेले लोक पाहून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार चांगलेच भडकले. ‘हे बघा हे पठ्ठे, येथे बिनमास्कचे फिरत आहेत. आता त्यांच्यापुढे डोके फोडून घ्यावे का’, असा आपल्या खास शैलीत त्यांनी कानटोचणी केली .

 राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात  यावेळी आयोजित सभेत बोलताना अजित पवार म्हणाले कि कोरोना आणि त्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्वांचेच हाल झाले. त्यातूनही मार्ग काढत राज्य सरकारने उपाययोजना केल्या. पुरेशी आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, या काळात आर्थिक विकासाचा दर खाली आला. सरकारी तिजोरीत पैसे येणे कमी झाले. अर्थसंकल्पात जे ठरविले, तेवढेही पैसे येत नव्हते. केंद्र सरकारकडे २५ हजार कोटी रुपये येणे बाकी आहेत. तरीही आपले महाविकास आघाडीचे सरकार वचन पाळणारे सरकार आहे.

 

                 कोणी कोणत्या चष्म्यातून पाहायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे – अण्णा हजारे

उपलब्ध पैशांत कामे सुरूच ठेवली. राज्य सरकारचा सर्वांत मोठा खर्च पगार आणि निवृत्ती वेतनावर होतो. दरमहा सुमारे १२ हजार कोटी रुपये यासाठी लागतात. त्यानंतर उरलेल्या पैशातून कामे करावी लागतात. असे असले तरी कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. करोनाला हसण्यावारी घेऊ नका. आपण कोरोनाची काळजी घेणे आवश्यक आहे. असे असले तरी अद्यापही अनेक जण दुर्लक्ष करीत आहेत. येथेही हे बघा अनेक पठ्ठे बिनामास्कचे आले आहेत. ज्यांनी मास्क लावले आहेत, त्यातील अनेकांनी येथे वाटलेले मास्क लावल्याचे दिसून येत आहे. असे करू नका. ब्रिटनमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.

                     अण्णा तुम्ही आंदोलन फक्त काँग्रेस राजवटी मध्येच करणार का ? – शिवसेना 

Related Posts
1 of 1,290

  नगर जिल्ह्याने आम्हाला भरभरून दिले – 

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले कि नगर जिल्ह्यात निवडून आलेले बहुतांश आमदार तरुण आहेत. त्यातच राहुरीचे आमदार तनपुरे यांना राज्यमंत्रिपद मिळाले आहे. मी जेव्हा नवीन राज्यमंत्री झालो, त्यावेळी माझ्याकडे तीनच खाती होती. आता तनपुरे यांच्याकडे किती तरी जास्त खाती आहेत. त्याचा उपयोग त्यांनी पक्षाचे आमदार असलेल्या मतदारसंघात जास्तीत जास्त करावा. नगर जिल्ह्याने आम्हाला भरभरून दिले आहे. आता त्यांचे हित जोपासणे आमची जबाबदारी आहे, असेही  अजित पवार म्हणाले.

मागासवर्गीय तरुणावर तलवारीने हल्ला, तीन जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल..

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: