शुल्लक कारणावरून तरुणावर तलवार आणि कोयत्याने वार, गुन्हा दाखल

0 277
 पुणे –  माझ्या अंगावर मोटारसायकल का घातली याचा जाब विचारला म्हणून तरुणाच्या वाहनाची तोडफोड करुन त्याच्यावर तलवार आणि कोयत्याने वार करुन तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील स्वारगेट भागात घडली आहे. या प्रकरणात राम राजू उमाप (वय २५, रा. अण्णाभाऊ साठेनगर, अरण्येश्वर, सहकारनगर)  या तरूणाने दिलेल्या फिर्यादीवरून अक्रम शेख, अन्वर ऊर्फ जम्ब्या शेख, शाहरुख शेख, ओंकार पवार, अमित शेकापूर, इमात शेख (सर्व रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) या सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Limited by a sword and culping, a sword and a warder)
या प्रकरणाबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी कि  राम उमाप हे रविवारी  बहिणीकडे राखी बांधण्यासाठी चालले असताना अन्वर शेखने उमाप यांच्या अंगावर मोटारसायकल घातली. उमाप यांनी त्याचा जाब विचारला असता आरोपीने शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सोमवारी पहाटे ३ वाजता राज यांच्या घराजवळ जाऊन गोंधळ घालून त्यांच्या दुचाकीचा आरसा फोडून नुकसान केले.

अवैध संबंधांच्या संशयातून सासऱ्यानं केली सुनेसह 5 जणांची निर्घृण हत्या 

Related Posts
1 of 1,481
ते सोमवारी दुपारी २ वाजता वडिलांच्या घरी जात असताना गिरीधर भवन चौकात अक्रम शेख याने विनाकारण लाथ मारली. त्याचा फिर्यादीने जाब विचारल्यावर सर्व जण टोळक्याने येऊन फिर्यादी यांच्या डोक्यात तलवारीने वार केला. शाहरुख शेख याने त्याच्याकडील तलवारीने फिर्यादीचे मित्र गोविंद याच्या पोटात घुसवून त्यांना जबर जखमी केले. अमित शेकापूर याने उमाप यांना बांबुने मारहाण केली. आजू बाजूच्या लोकांनी मदतीला येऊ नये, म्हणून या टोळक्याने हातात तलवारी, कोयते, पालघन व बांबू घेऊन परिसरात दहशत माजवली. या संपूर्ण घटनेचा तपास स्वारगेट पोलीस करीत आहेत. (Limited by a sword and culping, a sword and a warder)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: