गुरुकृपेने जीवन यशस्वी होतेय….
कीर्तनातून बोध घेऊन जीवन यशस्वी केल पाहिजे. गुरुमंत्राने अनेकांचे जीवन यशस्वी झाले आहे.

अहमदनगर : कीर्तनातून बोध घेऊन जीवन यशस्वी केल पाहिजे. गुरुमंत्राने अनेकांचे जीवन यशस्वी झाले आहे. गुरुकृपा झाली तर जीवन सुखकर होते. कितीही संकटे आली, तरी गुरुकृपेने त्यांचे निवारण होते, असा उपदेश अमोल सातपुते महाराज यांनी केला.
शेवगाव ची दंगल पूर्वनियोजित, आपल्या मनगटात दम ठेवा – विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे
बोल्हेगाव येथील नवनाथ मंदिरात अपरा एकादशीनिमित्त अमोल महाराज सातपुते यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. सायंकाळी सात ते नऊ कीर्तन झाले. कीर्तनाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. सातपुते महाराज म्हणाले, की कीर्तनाने प्रत्येकाने आलेच पाहिजे. यातून जीवनाला मार्ग मिळत असतो.