खर्डा ग्रामपंचायतचे बांधकाम खात्याला पत्र, नगर – उस्मानाबाद राज्यमार्ग हद्द रस्ता दुरूस्त करण्याची मागणी

0 11
जामखेड –  अहमदनगर उस्मानाबाद या राज्यमार्गावरील खर्डा ते भूम हद्दीतील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून यामुळे अपघाताच्या घटना घडत असल्याने सदर रस्ता दुरूस्त करण्याची मागणी खर्डा ग्रामपंचायतचे सरपंच नमिता गोपाळघरे, उपसरपंच रंजना लोंखडे व ग्रामपंचायत सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय कांबळे यांना निवेदन देऊन केली आहे.

ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याची मागणी 

खर्डा ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर उस्मानाबाद हा राज्य मार्ग क्रमांक १५७ खर्डा येथून जात आहे. खर्डा हद्दीतील संजीवनी हॉस्पिटल ते भूम हद्द या दोन कि. मी. रस्त्यावर दुकाने व हॉटेल असल्याने यांचे पाणी रस्त्यावर येते त्यामुळे रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर दोन दोन फुट खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालन व पदाचा-यांना रस्त्यावर चालताना कसरत करावी लागत आहे. वाहन चालकांना खड्डे चुकवताना अपघात झाले आहे दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे.

Related Posts
1 of 1,292
जामखेड शहरातील खर्डा चौक ते भूम हद्द दुरूस्तीसाठी साडेसहा कोटीचे टेंडर मधील काम चालू होऊन वर्ष लोटले परंतु खर्डा हद्दीतील रस्ता दुरूस्त केला नाही तरी ते काम तात्काळ करण्याची मागणी सरपंच नमिता गोपाळघरे, उपसरपंच रंजना लोंखडे, ग्राम पंचायत सदस्य वैभव जमकावळे, महालिंग कोरे यांनी जामखेड येथे येऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे. 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: