चंद्रकांत पाटलांसाठी शोकसभा घेऊ आणि शोक व्यक्त करू – संजय राऊत

0 205

नवी मुंबई –   देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मोठा निणर्य घेत केंद्र सरकार (Central Government) ने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांना (Three farmers laws) मागे घेतल्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर देशातील विविध नेत्यांनी यावर आप आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची देखील या विषयावर प्रतिक्रिया आली. त्यांनी देशातील अशांतता संपवण्यासाठी मी हा निर्णय घेत असल्याचं मोदींनी सांगितलंय. मी मोदींना विनंती करेन की पुन्हा एकदा सर्वांना समजावून सांगून हे शेतकऱ्याच्या हिताचे कायदे देशात पुन्हा आणले पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली. (Let’s hold a mourning meeting for Chandrakant Patil and express our condolences – Sanjay Raut)

त्यांच्या या प्रतिक्रियेवर शिवसेना (Shiv Sena) खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. राऊत आज मुंबईत पत्रकारणाशी बोलत होते. यावेळी त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर त्यांनी उत्तर देत पाटील यांच्यावर टीका  केली आहे.

राऊत म्हणाले मी आता चंद्रकांत पाटलांनी शोकसंदेश पाठवतो. त्यांच्यासाठी कृषी कायदे मागे घेणं ही दुःखद घटना असेल तर आपण त्यांच्यासाठी एखादी शोकसभा घेऊ आणि शोक व्यक्त करू. ज्या देशात आज शेतकरी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहेत तो जर कुणाला शोक वाटत असेल, दुःख वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल

संजय राऊत पुढे म्हणाले, कृषी कायदे मागे घेतल्यानं शेतकऱ्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्याची पहाट उगवली आहे. दीड वर्षापासून शेतकरी ज्या तणावात, दबावात, दहशतीत होता ते जोखड आता निघालंय. स्वातंत्र्य काय असतं? कंगना रणौत, विक्रम गोखले सांगतात ते स्वातंत्र्य नाही. त्यांची व्याख्या वेगळी असेल. तुमच्या मनावरील जोखड जेव्हा निघून जातं ते स्वातंत्र्य असतं. शेतकऱ्याला त्याच्या आपल्या शेतीचा मालक नाही तर गुलाम बनवणारे हे कायदे होते.

Related Posts
1 of 1,518

Jobs सरकारी बँकेत भरती सुरू, जाणून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया

नव्या प्रकारची कॉर्पोरेट जमीनदारी या देशात लादली जाणार होती. ईस्ट इंडिया कंपनी ज्या प्रकारे व्यापारासाठी देशात घुसली आणि देश पारतंत्र्यात टाकला त्या प्रमाणे भांडवलदारांना नव्या ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी कायदा बनवला. या देशातील शेतकऱ्यांनी एक ते दीड वर्ष रस्त्यावर ऊन, वारा, पावसाचा विचार केला नाही. रक्त, बलिदान, मंत्र्यांनी चिरडलं, पोलिसांनी गोळीबार केला, भाजपाच्या नेत्यांनी हरियाणाच्या रस्त्यावर गुंड पाठवले. यानंतरही पंजाब-हरियाणाचा शेतकरी मागे हटला नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं. (Let’s hold a mourning meeting for Chandrakant Patil and express our condolences – Sanjay Raut)

हे पण पहा – बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पोलिसांनी पकडला..

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: