दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये घबराट

त्यानंतर दोन दिवसांपूर्वी दि.१८रोजी रात्री नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास याच भागात पेडगाव रस्त्यावर असलेल्या वीटभट्टी नजीक काही लोकांना बिबट्या दिसला होता लोकांनी फटाकडे वाजवत त्याला पळवून लावले. रात्री अपरात्री दिसणारा हा बिबट्या आता दिवसासुद्धा लोकांना दिसत असून तो अगदी शहरानजीक येऊन ठेपला आहे तो आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सरस्वती नदी शेजारील वारकर मळा येथे काही लोकांना दिसला त्यानंतर लोकांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली.
वनविभागाने घटनास्थळी जाऊन पाऊलखुणांवरून बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता बिबट्या त्या भागातुन दुसरीकडे निघून गेल्याचे वनविभागाने सांगितले परंतु रात्री व दिवसा अश्या दोन्ही वेळेला अगदी शहरानजीक हा बिबट्या मुक्त संचार करत असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेयाबाबत श्रीगोंदा वन विभागाशी संपर्क साधला असता बिबट्याचा वावर या भागात असल्याचे सांगून आम्ही लोकांचे प्रबोधन करत आहोत बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू असून तो सतत जागा बदलत असल्यामुळे त्याला पकडण्यात अडचण येत असल्याचे सांगितले.