DNA मराठी

जखणगाव शिवारात बिबट्याने शेळी केली ठार; परिसरात खळबळ

0 114
Leopards roar in broad daylight, panic among citizens

 

अहमदनगर – तालुक्यातील जखणगाव येथील शेतकरी जयसिंग मोरे यांची दोन वर्षे वयाची गाभण असलेली शेळीवर बिबट्याने शुक्रवारी पहाटे एक वाजता हल्ला तिला फस्त करून बिबट्या पसार झाला.

 

हिंगणगाव, जखणगाव रोडवर मोरे यांची वस्ती आहे. जलयुक्त शिवार, उंबरनाला व जामगाव नाल्यावर बांधण्यात आलेल्या अनेक बंधाऱ्यांची साखळी त्यामुळे पाणीदार झालेला हिंगणगाव परिसर. या पाण्यामुळे ऊस लागवडीत हिंगणगाव अग्रभागी आहे. उसाचे वाढते क्षेत्रामुळे हिंगणगाव परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. याअगोदर गेले वर्षभर सातत्याने वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी हिंगणगावचे सरपंच तथा सरपंच परिषद जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी केली आहे. बिबट्याने घरापासून अवघ्या २० फुटांवरच शेळी ओढून फस्त करण्याचा प्रयत्न केला.

 

 

 

Related Posts
1 of 2,452

परंतु घरातील लोकांना बिबट्यावर हल्ला करीत असताना आवाज झाल्यामुळे घरातील सर्वजण जागे झाले. लाईट चालू केले असता बिबट्या घराजवळच बसून शेळी खात होता. त्याला पाहताच घरातील महिला बेशुद्ध पडली. इतरांनी गडबडीत दगड मारून बिबट्याला हसकवण्याचा प्रयत्न केला. परंतु बिबट्या दाद देत नव्हता. शेळीचे रक्त पिऊन बिबट्या निवांत शेतात निघून गेला. घडलेल्या घटनेचा पंचनामा व पोस्टमार्टम पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी- १ हिंगणगाव येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. मुकुंद राजळे, वन विभागाचे कर्मचारी येणारे यांनी केले. यावेळी हिंगणगाव सरपंच आबासाहेब सोनवणे, दत्तू सोनवणे, उपसरपंच मुकुंद दुवे, जयसिंग मोरे, बबई मोरे, निसार पठाण, दीपक मोरे, विजय मोरे, सचिन मोरे हजर होते.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: