
वनकुट्यातील साहेबराव बाचकर यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने त्यांचा संसार उघडयावर आला. त्यांची मुलगी राणी हिच्या पायावर दगड पडून ती जखमी झाली. आ.लंके यांनी राणी हिची विचारपूस करून तिच्यावर उपचार करण्याच्या सुचना दिल्या. बाळासाहेब खामकर यांच्या घरापुढील टपरी उडून शेजारच्या शेतात जाऊन पडली. त्यात एक गाय जखमी झाली. बबन मुसळे यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने संसारऊपयोगी साहित्याचे नुकसान झाले. पत्रे उडाल्यानंतर दगड पडल्याने ७१ वर्षीय बबन मुसळे यांच्या खांद्याला जखम झाली. आ. लंके यांनी मुसळे कुंटूंबास धिर देत मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.
पुन्हा अहमदनगरसह राज्यातील अनेक वादळी पावसाची शक्यता…
गोरक्षनाथ गायकवाड यांना घरकुल योजनेअंतर्गत घर मंजुर झाले असून त्याचे सुरू असलेले बांधकाम पाउस तसेच गारपीटीमुळे जमीनदोस्त झाले. त्याचीही आमदार निलेश लंके यांनी पाहणी करून त्यांना शासनाची काय मदत करता येईल यासाठी प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. पळशी येथील मोहन शिंदे यांची विटभट्टी तसेच कामगारांच्या घरांचे गारपिटीने नुकसान झाले. प्रविण गागरे यांच्या गोठयावरील पत्रे उडाल्याने तेथील जनावरे रात्रभर उघडयावरच होती. विट भट्टीवरील पुनाजी बर्डे यांनी आ. लंके यांच्याशी संवाद साधताना आमच्या पोटाची खळगी कशी भरायची असा सवाल करीत मदतीची याचना केली. आ. लंके यांनी बर्डे यांच्यासह सर्वांना धिर देत मदतीची ग्वाही दिली. खडकवाडी येेथील टोमॅटो, कांदा पिकाच्या झालेल्या नुकसानीचीही आ. लंके यांनी पाहणी केली.
आ. लंके यांच्या समवेत अॅड. राहुल झावरे, प्रकाश राठोड, अप्पासाहेब शिंदे, श्रीरंग रोकडे, डॉ. रावसाहेब आग्रे, आदीनाथ ढवळे, अर्जुन कुलकर्णी, योगेश शिंदे, रवि ढोकळे, गणेश मधे, अमोल डूकरे, बाळासाहेब खामकर, रामा साळवे, प्रविण गागरे, संकलेश मोढवे आदी यावेळी उपस्थित होते.
आदेश शितोळे यांची स्वच्छतामित्र म्हणून निवड….
किती दिवस धुळफेक करणार ?
हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उदासिन आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कीतीही दौरे करावेत, देवदर्शन करावे त्यावर आपली काहीही तक्रार नाही. परंतू हे करीत असताना त्यांनी शेतकऱ्यांकडेही पहावे. सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास तयार नाही. ते कीती दिवस धूळफेक करणार आहेत ? किती दिवस फसवणार आहेत ? महसूलमंत्री, पालकमंत्री मोठी माणसे आहेत. त्यांच्याकडून अपेक्षा होती मात्र ते देखील शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाहीत ही खेदाची बाब आहे.
– नीलेश लंके, आमदार