शेडगाव सोसायटीच्या चेरमन पदी लक्ष्मण रसाळ व्हा चेरमन किसन बेल्हेकर यांची निवड

0 258

श्रीगोंदा :- तालुक्यातील शेडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेरमन पदी लक्ष्मण रसाळ व्हा चेरमन किसन कोंडीबा बेल्हेकर यांचीसर्वानुमते निवडकरण्यात आली आहे त्यांच्या निवडीनंतर राजकिय सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील लोकांकडून शुभेच्छा वर्षाव होताना दिसत होता.

श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली होती यामध्ये रसाळ लक्ष्मण निवृत्ती भोपळे अमोल बाळासाहेब, शेंडे राजेंद्र गुंडिबा भदे हौसराव भानुदास, भुजबळ जगन्नाथ गेनू . धेंडे सिताराम बाबू ,बेलेकर किसन कोंडिबा, गोरे सखाराम ज्ञानदेव , चेंडे उत्तम एकनाथ, मदे सिताबाई रोहिदास रसाळ सुरेखा मारुती, राऊत दत्तात्रय किसन, गोयेकर संपत बाबाजी याचे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते.

त्यानंतर स्वीकृत संचालक म्हणून अशोक देवराम गवळी यांचीही निवड करण्यात आली आहे आज महात्मा फुले जयंतीच्या मुहूर्तावर चेरमन व्हा चेरमन यांच्या काढलेल्या निवडणुकीच्या कार्यक्रमात सर्व संचालक यांच्या सर्वानुमते चेरमन पदी लक्ष्मण रसाळ व्हा चेरमन किसन कोंडीबा बेल्हेकर यांची निवड करण्यात आली आहे.

Related Posts
1 of 2,357

निवडीनंतर सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला या वेळी श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रा सुरेश रसाळ सरपंच परिषद तालुका अध्यक्ष व माजी सरपंच विजय शेंडे वामनराव भदे,माजी चेरमन लिंबाजी रसाळ,विजय रसाळ ,बुवाजी रसाळ ,शांताराम रसाळ,भीमराव बेल्हेकर, आप्पासाहेब भोसले आप्पा शेंडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते निवडीनंतर सर्वच स्तरातून नवनिर्वाचित चेरमन व्हा चेरमन तसेच संपुर्ण संचालक मंडळ त्यांच्यावर शुभेच्छा वर्षाव होताना दिसत होता.

आता लक्ष पंचायत समिती व जिल्हा परिषद- सरपंच परिषद तालुका अध्यक्ष
शेडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीनंतर बोलताना सरपंच पदी परिषदेचे तालुका अध्यक्ष विजयकुमार शेंडे यांनी सांगितले आता लक्ष पंचायत समिती व जिल्हा परिषद आहे त्यामुळे सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष विजयराव शेंडे यांनी केले आहे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: