आजादी का अमृत महोत्सव ‘ या कार्यक्रमाचा शुभारंभ

0 254

श्रीगोंदा  :-  दि 2 ऑक्टोबर शनिवार रोजी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण  मा . सर्वोच्च न्यायालय , दिल्ली व राज्य विधी सेवा प्राधिकरण , मा.उच्च न्यायालय , मुंबई व मा . जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , अहमदनगर यांचे आदेशान्वये ‘ आजादी का अमृत महोत्सव ‘ या कार्यक्रमाचा शुभारंभ आज रोजी सकाळी ९ .०० वा . तहसिल कार्यालय , श्रीगोंदा येथुन प्रभात फेरी काढुन करण्यात आला .

या कार्यक्रमामध्ये सर्व शासकिय खात्यातील अधिकारी व कर्मचारी ,सर्व वकील मंडळी , कोर्टातील न्यायालयीन कर्मचारी , सर्वजन आपआपल्या खात्यातील योजनांची फलके घेवुन रॅलीमध्ये सामिल झाले होते . तसेच छत्रपती शिवाजी महाविद्यालय , महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय यांचे एन.सी.सी. तसेच कन्या विद्यालयाचे झांज पथक , दोन्ही कॉलेजचे प्राचार्य व प्राध्यापक रॅलीमध्ये सामिल झाले होते . तसेच मुजीब एस.शेख साहेब , अध्यक्ष , तालुका विधी सेवा समिती , तथा जिल्हा न्यायाधीश वर्ग -१ , एन.जी.शुक्ल साहेब , जिल्हा न्यायाधीश -२ , श्री.एस.एस.शिंदे साहेब , दिवाणी न्यायाधीश , व.स्तर , श्री.एन.एस.काकडे साहेब , सह दिवाणी न्यायाधीश , क.स्तर व श्रीमती . एस.जी.जाधव , २ रे सह दिवाणी न्यायाधीश , क.स्तर श्रीगोंदा , प्रांताधिकारी दाभाडे मॅडम , तहसिलदार कुलथे साहेब , अप्पर तहसिलदार पवार मॅडम , मुख्याधिकारी मंगेश देवरे साहेब , गटविकास अधिकारी शेलार , प्राचार्य म्हस्के सर , प्राचार्य सुर्यवंशी सर , पोलीस निरिक्षक रामराव ढिकले , गट शिक्षण अधिकारी अनिल शिंदे साहेब , वैदयकिय अधिकारी नितीन खामकर , वन विभागाचे अधिकारी नातू साहेब , नगराध्यक्षा शुभांगी पोटे  , पत्रकार दादा सोनवने, समाजसेवक , अॅड श्री . झेड.टी.गायकवाड , अॅड श्रीमती . व्ही.एन.जाधव – घोडके व इतर सर्व वकील मंडळी व पदाधिकारी हजर होते .

सदरचा कार्यक्रम हा कोरोणाचे सर्व नियम पाळुन व मर्यादित संख्या ठेवुन साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचा समारोप हा तहसिल कार्यालयामध्ये विविध खात्यातील लोकांचा सन्मान करुन झाला . दिनांक २५ सप्टेंबर रोजी लोक अदालतीमध्ये उत्कृष्ट काम केल्याबददल गट विकास अधिकारी शेलार साहेब , श्रीगोंदा वकील संघाचे अध्यक्ष अॅड  एस.एच. कापसे , मुख्याधिकारी मंगेश देवरे साहेब , प्रांताधिकारी स्वाती दाभाडे , तहसिलदार मिलिंद कुलथे साहेब , उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव साहेब , यांचा सन्मान करण्यात आला.तसेच महाराष्ट्र शासनातर्फे मोफत संगणकीय सात बाराचे वाटप अध्यक्ष , तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा न्यायाधीश – वर्ग १ मुजीब एस.शेखसाहेबा व प्रांताधिकारी दाभाडे मॅडम यांचे हस्ते करण्यात आले .

गडकरी म्हणाले, साहेब त्याची आम्हाला लाज वाटते, त्यांना वाटते की नाही माहिती नाही!

Related Posts
1 of 1,608

तसेच कोरोणा काळात सफाई कर्मचारी यांनी बेवारस प्रेतावर अंत्यसंस्कार करुन व स्वच्छतेचे काम केलेमुळे त्यांचा सत्कार करण्यात आला . आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होवुन लोकांना याचा फायदा होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन   मुजीब एस . शेख , अध्यक्षा तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा न्यायाधीश – वर्ग१ श्रीगोंदा यांनी केले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अँड जयंत बी.शिंदे व आभार प्रदर्शन अॅड श्री.एस.के.भोस यांनी केले .

हे पण पहा  – Ahmednagar | सफर चंद्रा वरची | Ride is on the moon

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: