राळेगणसिद्धीत मोठा पोलीस बंदोबस्त, जमावबंदीचा आदेश लागू; जाणुन घ्या संपूर्ण प्रकरण

0 402
Large police presence in Ralegan Siddhi, curfew imposed; Learn the whole case
 प्रतिनिधी DNA मराठी टीम 
अहमदनगर  –   टँकर (Tanker) गैरव्यवहार प्रकरणी लोकजागृती सामाजिक संस्थेचे रामदास घावटे आणि बबनराव कवाद यांनी सोमवारी (११ एप्रिल) राळेगणसिद्धीत (Ralegan Siddhi)उपोषणाचा इशारा दिल्याने प्रशासनाने तेथे जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रवादीचे काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी झालेल्या आक्रमक आंदोलच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बाळगली आहे.
Related Posts
1 of 2,427
 टँकर गैरव्यवहारात अडकलेल्या कंपनीचे काही पदाधिकारी राळेगणसिद्धीचे असल्याने त्यांच्यावर अण्णा हजारे (Anna Hazare) आणि ग्रामसभेने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आजपासून गावात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. हजारे यांना झेड सुरक्षा व्यवस्था आहे. त्यामुळे अधिक काळजी घेण्यात येत आहे. आंदोलक उपोषण करण्यावर ठाम असल्याने रात्रीपासूनच पोलिस सावध आहे.
गावात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हजारे गावातच असून त्यांचे प्रशिक्षण केंद्रात नित्याचे काम आणि भेटीगाठी सुरू असल्याचे सांगण्यात आले. तेथेही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इशारा दिलेले कार्यकर्ते अद्यापपर्यंत राळेगणसिद्धीत आले नव्हते.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: