लारा दत्ता कोरोना पॉझिटिव्ह; BMC ने घेतला मोठा निर्णय; केली ‘ही’ कारवाई

रिपोर्ट्सनुसार लारा दत्ताला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. एवढंच नाही तर मुंबई महानगरपालिकेनं अभिनेत्रीचं मुंबईतील घर सील केलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार महानगरपालिकेनं लाराच्या मुंबईतील घराबाहेर मायक्रो कंटेनमेंट झोनचं पोस्टर लावले आहे. दरम्यान आपल्या कुटुंबात लारा दत्ता एकटीच कोरोना संक्रमित झाली आहे. मात्र तिने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
लारा दत्ताच्या कामाबद्दल बोलायचं तर ती अखेरची बेल बॉटम चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती. ज्याचं बरंच कौतुक झालं होतं. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार, वाणी कपूर आणि हुमा कुरैशी यांच्या मुख्य भूमिका होत्या.