हिंगोली जिल्ह्यातील तळणीच्या कुमारी समृध्दी ‌खदारे  लेकीचा आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्लेक बेल्ट देऊन गौरव

0 9

हिंगोली –  हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामध्ये असलेल्या   तळणी येथील रहीवासी विजय खंदारे यांची मुलगी कुमारी समृध्दी ‌खदारे हिने कमी वयातच म्हणजे केवळ १४ वर्षाच्या  समृध्दी ने इयत्ता सातवी चे  शिक्षण घेत आपल्या जिद्द चिकाटी आणि मेहनत व धैय समोर ठेवून डिफेन्स स्पोर्ट्स अकादमी अकरुडी  अरविंद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्लँक बेल्ट डिग्री शोदान ब्लँक बेल्ट प्राप्त करून हिंगोली जिल्ह्यांचे नावं आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन आज पोहोचले .

सेनगाव तालुक्यात नेहमीचा दुष्काळ अशा दुर्गम,आर्थिकदृष्ट्या मागास भागात मुलींना प्राथमिक शिक्षण मिळत नाही,शिक्षणापासून वंचित राहावे लागते याआशातच तळणी येथिल  विजय खंदारे हे तळणी गाव सोडून पुणे येथे काम करण्यासाठी  आपलं कुटुंब निर्वाहासाठी गेले आणि बर्याच वर्षांपासून ते पुणे येथे राहत आपलं कुटुंब सांभाळून मुलीला शिक्षण देण्याच काम विजय खंदारे यांनी केले . हलाखीच्या परिस्थितीचा सामना करत आपल्या मुलीला शिक्षण देण्याच महत्वाचे कार्य केले आहे.

महिलेला बंदुकीचा धाक दाखवून लैंगिक शोषण करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल

हिला आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित मिक्स मार्शल आर्ट संस्था NBSII मार्फत शोदान ब्लॅक बेल्ट देऊन सन्मान करण्यात आला . आंतरराष्ट्रीय स्तरावरील निप्पोन बुडो सोगो इंटरनॅशनल इंडिया मार्फत घेण्यात आलेल्या मिक्स मार्शल आर्ट ब्लॅक बेल्ट परीक्षेत मेहुल वोरा अध्यक्ष -कुडो इंटरनॅशनल फेडेरेशन ऑफ इंडिया व अध्यक्ष – निप्पोन बुडो सोगो इंटरनॅशनल इंडिया यांच्या शुभहस्ते व जस्मिन मकवाना खजिनदार कुडो इंटरनॅशनल फेडेरेशन ऑफ इंडिया व सचिव कुडो असोसिएशन महाराष्ट्र, विपुल सुरु कुडो रेफ्री कौन्सिल अरविंद मोरे अध्यक्ष पुणे जिल्हा निप्पोन बुडो सोगो इंटरनॅशनल इंडिया यांच्या उपस्थितीत शोदान ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला .

Related Posts
1 of 1,301

कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता चालू वर्षी यात्रोत्सवास प्रतिबंध – पोलीस निरीक्षक रामराव ढिकले

निप्पोन बुडो सोगो हा कुडो मिक्स मार्शल आर्टचा पाया आहे निप्पोन बुडो सोगो इंटरनॅशनल इंडिया संस्थेमार्फत ब्लॅक बेल्ट पदवी घेतलेले अनेक मोठी नावे असून यामध्ये ब्लॅक बेल्ट आदित्य ठाकरे,कतरीना कैफ,रणवीर कपूर,सोनाक्षी सिन्हा,कपिल शर्मा,विकी कौशल,टायगर श्रॉफ असून त्यात प्रथमच पुणे जिल्हातील पिंपरी चिंचवड शहरातील एकूण 41 तर हिंगोली जिल्हा तळणी येथिल कु.समृध्दी विजय खंदारे ब्लॅक बेल्ट हा मान मिळाला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंगोली जिल्हातील कु.समृध्दी खंदारे हि एकमेव मुलगी ब्लेक बेल्ट आसुन अगदी कमी वयात कु.समृद्धीने उत्तुंग यश संपादन केल्याबद्दल कुडो संघटना पुणे,निप्पोन बुडो सोगो इंटरनॅशनल इंडिया सह तळणी गावकऱ्यांनी समृद्धीचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

मनसुख हिरेन प्रकरणावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले कि … 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: