DNA मराठी

Ahmadnagar Crime:- कोयता गँगचा नगरमध्ये सक्रीय….

कोयता गँगमुळे बोल्हेगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले

0 176

कोयता गँगचा नगरमध्ये सक्रीय….

नगर : कोयत्याचा धाक दाखवून चार जणांच्या टोळीने बुधवारी पहाटे बोल्हेगाव उपनगरातील नवनाथनगरमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला.
बोल्हेगावात दोन ठिकाणी घरफोडी करून पाच लाख 40 हजार रुपयांची रोख रक्कम व साडे अकरा तोळे सोन्याचे दागिने असा एकूण आठ लाख 95 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

राहुल गांधी या शिक्षेविरूद्ध अपील करतील,- अभिषेक मनु सिंघवी – न्यायालयीन प्रक्रिया योग्यप्रकारे पाळली नाही. 

Related Posts
1 of 2,492

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक (नगर शहर) अनिल कातकाडे, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ भाऊसाहेब भोर (वय 35 रा. नवनाथनगर, बोल्हेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी (ता. 21)ला रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास भोर कुटुंब रात्रीचे जेवण करून झोपी गेले होते. त्यानंतर हा प्रकार घडला.
या कोयता गँगमुळे बोल्हेगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यातील ही कोयता गँग आहे की नवीन गँग तयार झालीय याचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: