राज्यात प्रतिबंध असलेल्या सुगंधी तंबाखु साठयावर कोतवाली पोलीसांची धाडसी कारवाई

0 253

अहमदनगर –    महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात प्रतिबंध असलेल्या सुगंधी तंबाखू साठ्यावर कोतवाली पोलिसांनी (Kotwali police ) कारवाई  केली आहे. या कारवाईत  कोतवाली पोलिसांनी संतोष प्रकाश सोनवणे,सफल संतोप जैन आणि गोरक्षनाथ मच्छीद्र धाडगे या आरोपीना अटक केली  आहे. (Kotwali police take bold action against the stock of aromatic tobacco which is banned in the state)

पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना गुप्त बातमीदारा मार्फत कोतवाली पोलीस स्टेशन हददीत गोंधळे गल्ला माळीवाडा ,बुरुडगाव रोड भोसले मंगल कार्यालय जवळ  व जीपीओ चौक ते धरती चौक परिसरात मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखु मावा बनविण्यासाठी साठवून ठेवणे व वाहतुक करणे सुरू असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी लागलीच कोतवाली पोलीस स्टेशनचे पोसई मनोज महाजन व पोसई जी टी इंगळे यांना सदरची माहीती देवून त्यावर कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत करून पोसई/महाजन व पोसई/जी.टी. इंगळे यांनी कोतवाली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांना समक्ष बोलावून घेवून पोनि सो यांनी सर्व अधिकारी व अंमलदार यांना सविस्तर माहिती देवून पोसई/ मनोज महाजन यांनी पंच बोलावून घेवून पंचा समक्ष वेगवेगळे पथके तयार करून सदर पंचाना छापेबाबत सविस्तर माहीती देवून त्याप्रमाणे बातमीतील ठिकाणी छापे टाकून कारवाई केली आहे.

फ्लेचर पटेल कोण आहे? नवाब मलिकांचा पुन्हा एनसीबीवर आरोप

Related Posts
1 of 1,481

आरोपीविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्ग्रत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तपासकामी आरोपीना २८ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील अहमदनगर ,अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल सो. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. संपतराव शिंदे, पोसई/जी.टी. इंगळे, पोसई/मनोज महाजन पोना/शाहीद शेख, पोना/विष्णु भागवत, पोना/अभय कदम, पोना/ शरद गायकवाड, पोफो/ सुमित गवळी, पोको/सुशिल वाघेला, पोफो/ प्रमोद लहारे, पोको काजळे, पोको/खताडे यांनी केली आहे.(Kotwali police take bold action against the stock of aromatic tobacco which is banned in the state)

 हे  पण पहा –  शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या… | आ. मोनिका राजळे आक्रमक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: