किरीट सोमय्या यांचा मोर्चा आता मुख्यमंत्रीकडे, दिला “हा” इशारा

0 731

नवी मुंबई –   भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मागच्या काही महिन्यापासून सत्ताधारी महाविकासआघाडी मधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर स्वरूपाचे आरोप लावले आहे. या मंत्र्यांमध्ये अनिल देशमुख (Anil Deshmukh),अनिल परब (Anil Parab) आणि आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांच्या देखील नावांचा समावेश झाला आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचं कारण देत सोमय्या यांना विसर्जनात सहभागी होण्यापासून अडवण्यात आलं तर त्यांचा कोल्हापूर दौराही पोलिसांनी होऊ दिला नाही. त्यांना कराडमध्येच अडवण्यात आले. यावेळी सोमय्या यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, मी गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार आहे. तिथेही मोठा गैरव्यवहार घडलेला आहे. पुढच्या सोमवारी २७ तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये बंगल्यांचा जो घोटाळा केला आहे, त्याची पाहणी मी करणार आहे. तर अजित पवारांनी जो बेनामी कारखाना विकत घेतला आहे, जरंडेश्वर कारखाना त्याची पाहणी करायला ३० तारखेला जाणार आहे.

हे पण पहा –राष्ट्रवादी पुन्हा… नामदेव राऊतांचा भाजपला रामराम…

Related Posts
1 of 1,518

अनिल परब, अनिल देशमुख अशा सत्ताधारी मंत्र्यांनंतर आता किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वळवला आहे. मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्यांचे तब्बल २७०० पानी पुरावेच आपण आयकर विभागाकडे सादर केल्याचं किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं. तसेच, फक्त हसन मुश्रीफच नाही, तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या नावे हे पुरावे असल्याचं ते म्हणाले होते. मुश्रीफ यांच्या विरोधातला तिसरा घोटाळा लवकरच बाहेर काढणार असल्याचं त्यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे शिवसेनेत येण्याची शक्यता – जयंत पाटील

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: