पत्रकारांच्या ‘त्या’ प्रश्नावर किरीट सोमय्या भडकले; म्हणाले दादा ..

0 353
Kirit Somaiya was incensed at the journalist's 'that' question; Said Grandpa ..

प्रतिनिधी- DNA मराठी टीम 

मुंबई –  शिवसेना (shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut)यांनी भाजपाच्या माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya)  यांच्यावर मोठा आणि गंभीर आरोप लावला आहे. आएनएस विक्रांतसाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पैसा जमा करून ही रक्कम हडप केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याच प्रकरणावर आज किरीट सोमय्या यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला विक्रांतसाठी जमा केलेला पैसा गेला कुठे असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर सोमय्या गडबडले. सोमय्यांनी दादा… दादा… म्हणंत वेगळाच उत्तर दिले.

त्यानंतर पुन्हा पत्रकारांनी सोमय्यांना तोच प्रश्न विचारला. यावेळी मात्र सोमय्यांचा पारा चांगलाच चढला. मी पैसा किती जमा केला आणि तो कुठे गेला याचं उत्तर शिवसेना नेते संजय राऊत यांनीच दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच त्याचं उत्तर दिलं आहे. तुम्ही तेच तेच काय विचारता? असा संतप्त सवाल सोमय्या यांनी केला. मात्र, सोमय्या यांनी शेवटपर्यंत या पैशाचं काय झालं याची माहिती पत्रकारांना दिली नाही.

जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याप्रकरणी किरीट सोमय्या आज ईडीच्या कार्यालयात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत जरंडेश्वर साखर कारखान्याचे निवडक सदस्यही होते. यावेळी सोमय्यांना विक्रांतच्या निधीचं काय झालं? असा सवाल करण्यात आला. सोमय्यांना दोनदा हा प्रश्न विचारला. त्यावर ते संतप्त झाले. मला विचारलंच नाही, डायरेक्ट एफआयआर दाखल केली. पोलिसांनी अटक करण्यासाठी हे सेक्शन लावलं, तर पोलिसांनी सांगावं 58 कोटी कुठून आले? मी नाही सांगणार. राऊतांनीच हा आकडा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यावर सांगितलं आहे, असं उत्तर सोमय्यांनी तावातावात दिलं.

Related Posts
1 of 2,357

राऊतांनी डॉक्युमेंट द्यावेत, मग बोला

आता मला गुन्हेगार केलं आहे. त्यांच्याकडे माहिती असल्याशिवाय कसं करणार. आता उद्धव ठाकरेंनी सांगावं, तू खूप बोलतोय म्हणून मी तुझ्यावर गुन्हा दाखल केला आहे, असं आव्हानच सोमय्या यांनी दिलं. विक्रांतला आता 10 वर्ष झाले. राऊतांनी आरोप केला म्हणून प्रश्न उपस्थित झाला. आता चर्चा त्यांच्या आरोपाची आहे. आरोप का आला? कारण त्यांची प्रॉपर्टी जप्त केली. संजय राऊतांनी ही कंप्लेंट केली. संजय राऊत हे शिवसेना पार्लामेंट्री कमिटीचे सदस्य आहे, संजय राऊतांनी डॉक्युमेंट द्यावे, नंतर बोलावं, असं आव्हानच त्यांनी दिलं.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: