किरण गोसावीच्या अडचणीत वाढ , आणखी चार तरुणांच्या तक्रारी

0 191
 पुणे –   मुंबईमधील क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Party)  प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खान (Aryan Khan) याचा बरोबर सेल्फी घेऊन चर्चात येणाऱ्या फरार आरोपी किरण गोसावी (Kiran Gosavi) ला फसवणुकीच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी (Pune police) अटक केली आहे. या किरण गोसावीच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार किरीन गोसावी विरोधात आणखी चार जणांनी फसवणुकीची तक्रार केली आहे. (Kiran Gosavi’s difficulty increases, complaints of four more youths)
किरण गोसावीने परदेशात नोकरी लावण्याच्या बहण्याने या तरुणांची फसवणूक केली असून पोलिसांनी चारही तरुणांना गोसावी विरोधात तक्रार अर्ज देण्यास सांगितले. तक्रार करणारे 3 तरूण लष्कर परिसरातील असून, एक वानवडी परिसरातील रहिवासी आहे. या चार जणांचे अर्ज आल्यावर पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Related Posts
1 of 1,487
मिळालेल्या माहिती नुसार पालघर जिल्ह्यातील एडवण येथील दोन तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन तरुणांना परदेशात नोकरीनिमित्त पाठवण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.  पालघर तालुक्यातील एडवण या गावातील दोन तरुणांचीही त्याने दोन वर्षांपूर्वी फसवणूक केल्याचा आरोप झाला आहे. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो असे सांगून त्यांच्याकडून दीड लाखाची मागणी गोसावी याने केली होती. (Kiran Gosavi’s difficulty increases, complaints of four more youths)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: