King Khan करणार मोठा धमाका ! शाहरुखच्या फॅन्ससाठी मोठी बातमी

0 238

 नवी मुंबई –   बॉलीवूड (Bollywood) चा  किंग(King)  शाहरुख खान (Shah Rukh Khan) चे फॅन्स (Fans) २०१८ नंतर शाहरुख च्या चित्रपटाची  आतुरतेने वाट  पाहत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आता किंग खान शाहरुख लवकरच आपल्या फॅन्ससाठी  बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका करणार आहे.  पुढच्या वर्षी  शाहरुखच्या दोन चित्रपट त्याच्या फॅन्सला पाहायला मिळू शकतात. सिद्धार्थ आनंदचा ‘पठाण’ (Pathan) तसेच अभिनेता एटलीचासुद्धा (Atlee) चित्रपट करत असल्याची माहिती समोर आली आहे. (King Khan will make a big bang! Big news for Shah Rukh’s fans)

पठाण या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली असून  एटलीच्या  चित्रपटाची शूटिंग सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. एटलीच्या चित्रपटात शाहरुख खान साऊथ स्टार प्रियामनी (South Star Priyamani) आणि नयनतारा (Nayantara) सोबत झळकणार आहे.  एटलीच्या चित्रपटात शाहरुख डबल रोल निभावताना दिसणार आहे. म्हणजेच चित्रपटात एक नव्हे २ शाहरुख पाहायला मिळणार आहेत. तसेच चित्रपटाचं कथानक भारतीय पद्धतीच्या ‘मनी हिस्ट’वर तयार करण्यात आला आहे. यामध्ये शाहरुख खान एका मुलींच्या गॅंगचं नेतृत्व करताना दिसून येईल. तसेच चित्रपटात शाहरुख एक मुलगा आणि वडील या दुहेरी भूमिकेत दिसेल. अर्थातच तरुण शाहरुखसोबत एक वयस्कर शाहरुख पाहायला मिळणार आहे.
Related Posts
1 of 85
 
सध्या या चित्रपटाचं शूटिंग मुंबईमध्ये सुरु आहे. यापूर्वी चित्रपटाचं शूटिंग पुण्यामध्ये सुरु होतं. चित्रपटासंबंधी सर्व गोष्टी गुप्त ठेवल्या जात आहेत. शेवटचं शाहरुख खानला ‘जिरो’ या चित्रपटात पाहण्यात आलं होतं. या चित्रपटात शाहरुखने एक अनोखी भूमिका साकारली होती. तसेच या चित्रपटात शाहरुखसोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ या दोघी होत्या.  (King Khan will make a big bang! Big news for Shah Rukh’s fans)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: