DNA मराठी

रशिया-युक्रेन युद्ध दरम्यान किम जोंग उन ने वाढवली जगाची डोकेदुखी; केली मोठी घोषणा

0 576
Kim Jong Un raises world headaches during Russia-Ukraine war; made a big announcement
मुंबई –  एकीकडे रशिया आणि युक्रेन (Russia and Ukraine) यांच्या दरम्यान मागच्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या युद्धामुळे आता पर्यंत युक्रेनला खूप नुकसान झाले आहे. रशियावर देखील आता पर्यंत जगातील अनेक देशांनी निर्बंध लादले आहे. मात्र तरीही दोन्ही देशात युद्ध सुरुच असल्याने जगाची चिंता वाढली आहे.  तर आता दुसरीकडे जगाला पुन्हा एकदा चिंतेत टाकणारी बातमी समोर आली आहे.(Kim Jong Un raises world headaches during Russia-Ukraine war; made a big announcement)
नुकताच उत्तर कोरियाने (North Korea) बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. यानंतर आता पुन्हा एकदा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) याने नवी घोषणा करत आणखी धोकादायक शस्त्रास्त्रांची निर्मिती करणार असल्याचं जाहीर केलं आहे. उत्तर कोरियाच्या रक्षणासाठी आणखी मजबूत शस्त्रास्त्रांची निर्मिती करा, अशा सूचना किम जोंग उन याने देशातील लष्कराच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.किम जोंग उन ने केलेल्या नवीन घोषणामुळे संपूर्ण जगात चिंतेचा वातावरण निर्माण झाले आहे.
Related Posts
1 of 2,482
उत्तर कोरियाने काही दिवसांपूर्वीच आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली होती. त्यानंतर आता या देशाकडून आण्विक हल्ल्यासाठी अधिक उपयुक्त असणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या चाचणीसाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने याबाबत माहिती देत म्हटलं आहे की, ‘उत्तर कोरिया आपला शस्त्रसाठा आणखी आधुनिक करण्यासाठी लवकरच नव्या चाचण्या करू शकतो. यामध्ये आण्विक उपकरणांच्या चाचणीचाही समावेश असेल.’
उत्तर कोरियाची नवी चाचणी किती धोकादायक असणार?

किम जोंग उन याच्या नेतृत्वाखालील उत्तर कोरियाने गुरुवारीच ह्वासोंग-१७ या क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. या चाचणीमध्ये सामील असणाऱ्या वैज्ञानिकांची किम जोंग उने याने भेट घेत देशाचं संरक्षण करण्यासाठी आणखी मजबूत शस्त्रास्त्रांची निर्मिती करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. ज्या देशाकडे मोठं लष्करी सामर्थ असतं आणि आधुनिक शस्त्रास्त्र असतात तोच देश युद्धाची शक्यता रोखू शकतो आणि अशा देशाला इतर कोणताही देश नियंत्रित करू शकत नाही, असं किम जोंग उनने सांगितलं.

दरम्यान, एकीकडे रशिया-युक्रेन युद्धामुळे तणाव निर्माण झालेला असतानाच किम जोंग उन याच्या या आक्रमक भूमिकेमुळे जगाची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Kim Jong Un raises world headaches during Russia-Ukraine war; made a big announcement)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: