KBC 13; सात कोटींसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचा उत्तर तुम्हाला माहित आहे का ?

0 747

 नवी मुंबई –  ‘कौन बनेगा करोडपती’ (Kon Banega Crorepati) हा टीव्ही रिअ‍ॅलिटीशोला १३ व्या सीझन (KBC 13) नुकताच दर्शकांच्या भेटीस आला आहे. या १३ व्या सीझनचा दुसऱ्याच आठवड्यामध्ये पहिली करोडपती स्पर्धक मिळालेली आहे.  स्पर्धकाचा नाव हिमानी बुंदेल असं आहे. सोनी टीव्हीवर येणाऱ्या  ‘कौन बनेगा करोडपती’चे १३ व्या सीझन सुरु असून या सीझनमध्ये हिमानी यांनी एक कोटी रुपये जिंकले आहेत. मात्र त्यांना सात कोटीच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. तिने एक कोटी रुपये घेऊन गेम क्वीट करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती सोशल मीडियावर चर्चा विषय बनली आहे.

एक कोटीसाठी कोणता प्रश्न विचारण्यात आला?

एक कोटींसाठी हिमानी यांना  दुसऱ्या महायुद्धामध्ये फ्रान्समध्ये ब्रिटनची हेर म्हणून काम करताना नूर इनायत खान हीने कोणतं टोपणनाव वापरलं होतं?, असा प्रश्न विचारण्यात आलेला. या प्रश्नाला

A) वेरा एटकिस
B) क्रिस्टीना स्कारबेक
C) जुलीएन आईस्त्रर
D) जीन-मेरी रेनियर

असे चार पर्याय देण्यात आलेले. हिमानी यांनी बराच वेळ घेत कोणत्याही लाइफलाइनची मदत न घेता डी असं उत्तर दिलं. जे बरोबर आलं आणि त्या या सिझनच्या पहिल्या करोडपती ठरल्या. यानंतर हिमानी यांचे वडील, बहीण साऱ्यांना अश्रू अनावर झाले. हिमानीला ह्युंदाईची ऑरा ही कारही भेट देण्यात आली. या गाडीची किमान किंमत पाच लाख ९७ हजार इतकी आहे.

सात कोटींसाठी कोणता प्रश्न विचारण्यात आला?

सात कोटींसाठी हिमानी यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यांना या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. बराच वेळ विचार केल्यानंतर एक कोटींवरुन थेट तीन लाख २० हजारांवर येण्याऐवजी आपण शो क्वीट करुयात असा निर्णय हिमानी यांनी घेतला.

Related Posts
1 of 96

सात कोटींसाठी हिमानी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्समध्ये सादर केलेल्या प्रबंधाचं शीर्षक काय होतं ज्यासाठी त्यांना १९२३ साली डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली?, असा प्रश्न विचारण्यात आलेला.
A) द वॉण्ट्स अ‍ॅण्ड मीन्स ऑफ इंडिया
B) द प्रॉब्लेम ऑफ द रुपी
C) नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया
D) द लॉ अ‍ॅण्ड लॉयर्स

असे चार पर्याय देण्यात आलेले. हिमानी यांनी बराच वेळ विचार करुन आपल्याला सी पर्याय म्हणजेच नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया हे उत्तर वाटत असल्याचं सांगितलं. मात्र त्यांनी शेवटी धोका फार मोठा असल्याचं सांगत गेम क्वीट केला. या प्रश्नाचं बरोबर उत्तर बी म्हणजेच द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हे होतं.

तथाकथित नेत्याने मागितली पन्नास लाखांची खंडणी.! काय आहे श्रीगोंद्यातील हे प्रकरण.?

या पैशांचं काय करणार?

सात कोटी जिंकता आले नसले तरी दृष्टीहीन असूनही हेमानी यांनी एक कोटी रुपये जिंकल्याचा आनंद होस्ट असणारे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासह सर्व उपस्थित प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. हिमानीचा २०११ साली एक भीषण अपघात झाला. यामध्ये तिची दृष्टी गेली. मात्र इच्छाशक्तीच्या जोरावर या २५ वर्षीय तरुणीने आपलं शिक्षण पुन्हा सुरु केलं आणि आता ती एका शाळेत शिक्षिका आहे. या पैशांमधून दिव्यांग व्यक्तींसाठी तिला काम करायचं असून कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये वडिलांचा रोजगार केल्याने त्यांनाही एखादा उद्योगधंदा सुरु करण्यासाठी मदत करण्याची तिची इच्छा आहे.

हे पण पहा –  आमदार निलेश लंके यांच्या कामाचं राज्यमंत्री आदिती तटकरेंकडून कौतुक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: