कतरिना कैफ गरोदर? पती विकी कौशलनं सोडलं मौन,म्हणाला ..

मुंबई – बॉलीवूडची (Bollywood) चर्चित अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) ने नुकताच बॉलीवूड अभिनेता विकी कौशलसोबत (Actor Vicky Kaushal) लग्न केला आहे. या लग्नानंतर हे कपल नेहमीच सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत असते. नुकताच अभिनेत्रीने कतरिना कैफ ने पती विकी कौशलसोबत एक फोटो शेअर केला होता. यानंतर ती सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोशल मीडियावर ती गरोदर असल्याची चर्चा जोराने होत आहे. तिच्या कतरिनाच्या कपड्यांच्या स्टाइलवरून ती गरोदर असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
मात्र आता या सर्व चर्चावर तिचा पती आणि अभिनेता विकी कौशलनं मौन सोडलं आहे. कतरिना कैफ गरोदर असल्याच्या चर्चांवर विकी कौशलच्या टीमकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. विकी कौशलच्या जवळच्या सूत्रांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या माहितीनुसार, ‘या सर्व चर्चा केवळ अफवा आहे. सोशल मीडियावर पसरवली गेलेली वृत्तं देखील खोटी आहेत आणि यात कोणतंही तथ्य नाही.’ विकी आणि कतरिनानं मागच्या वर्षी लग्नानंतरच त्यांचं नातं ऑफिशिअल केलं होतं. त्याआधी कोणत्याही मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं नव्हतं किंवा नात्यासंबंधीत प्रश्न टाळले होते.
अलिकडेच विकी कौशल आणि कतरिना कैफ एकत्र न्यूयॉर्कमध्ये स्पॉट झाले होते. दोघांनीही सोशल मीडियावर आपल्या ट्रीपचे काही फोटो शेअर केले होते. यात कधी कतरिना गो- टू बेकरीमध्ये पिटस्टॉप बनवताना दिसली होती. तर कधी दोघंही स्विमिंग पूलमध्ये एकमेकांसोबत क्विलिटी टाइम स्पेंड करताना दिसले होते. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते.