कोल्हापूर – आज कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या मतमोजणी होत आहे. आज दुपारी बारा वाजेपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. 26 फेऱ्यात मतमोजणी होणार आहे. सध्या काँग्रेसच्या जयश्री जाधव (Jayashree Jadhav) आघाडी वर आहे. आता पर्यंत मतमोजणीच्या बारा फेऱ्या पूर्ण झाले आहे. या निवडणुकीत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप करत चर्चेत आलेल्या करुणा शर्मा (Karuna Sharma) देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. पोटनिवडणुकीत करूणा शर्मा अपक्ष उमेदवार होत्या.
मात्र आता त्यांनी काँग्रेस आणि भाजपावर गंभीर आरोप करत निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे. 10 तारखेला आचारसंहिता संपली असतानाही कॉंग्रेस आणि भाजपाने वृत्तपत्रात बातमी तसेच जाहीरात दिल्याचा आरोप करूणा शर्मांनी केला आहे. यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर करुणा शर्मा चर्चेत आल्या होत्या. करुणा शर्मा यांनी शिवशक्ती या नवीन पक्षाची घोषणा केली होती. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक लढवणार असून स्वत: मैदानात उतरण्याचे जाहीर केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होते. दरम्यान, या निवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे, जर निवडणुक रद्द झाली नाही. तर मी न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. माझ्याकडे या प्रकरणी पुरावा आहे, निवडणुक आयोगाकडे तक्रार करताना मी संबंधित वृत्तपत्रांची कात्रणं दिली आहे. निवडणुक आयोगाचे तसेच कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. यावर गांभीर्याने विचार व्हावा अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली आहे.