
आचारसंहितेचे उल्लंघन
दरम्यान, या निवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे, जर निवडणुक रद्द झाली नाही तर आपण न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात जाणार असंही त्या म्हणाल्या. निवडणूक आयोगाकडे तक्रार करताना आपण संबंधित वृत्तपत्रांची कात्रणं दिली आहे. निवडणूक आयोगाचे तसेच कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. यावर गांभीर्याने विचार व्हावा अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली आहे.
धनंजय मुंडेंच्या विरोधात निवडणूक लढवणार
येत्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत बीडमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा अशी लढत शंभर टक्के होणार असल्याचं शिवशक्ती पक्षाच्या करुणा शर्मा यांनी या आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे बीडकरांना 2024 साली नवरा विरुद्ध बायको अशी लढत पहायला मिळणार आहे. (Karuna Sharma got ‘so many’ votes in Kolhapur elections; Many discussions abound)