कराटे प्रीमियर लीग2021, शितो स्काय संस्थेच्या खेळाडूंनी पटकावले ११ स्वर्ण पदक

0 356

अहमदनगर –  अहमदनगर शहरातील (Ahmednagar city) वाडिया पार्क (Wadia Park) येथे ०७ नोव्हेंबर २०२१ रोजी पार पडलेल्या भव्य कराटे प्रीमियर लीग २०२१ (Karate Premier League) कराटे स्पर्धेमध्ये शितो स्काय (Shito Skaii) ( शितो रियो सपोर्ट कराटे – डो इंटरनॅशनल  इंडिया ) अहमदनगर या  संस्थेच्या  सर्व खेळाडूंना भरपूर यश मिळाले आहे.

या स्पर्धेमध्ये  शितो स्काय या संस्थेच्या मार्गदर्शना खाली काम करणारे आदिल सय्यद कराटे अकॅडमी (Adil Sayyed Karate Academy) ला  ११ सुवर्ण पदक आणि ४ रौप्य पदक मिळाले आहे. खेळाडूंना ०८ नोव्हेंबर २०२१ रोजी क्रीडा मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) , महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) ,  आमदार डॉ.सुधीर तांबे (Sudhir Tambe) ,आ.लहू कानडे (Lahu Kanade) ,काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे (Kiran Kale) , प्रवीण गीते तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पदकाचे वितरण करण्यात आले आहे.

या सर्व खेळाडूंना  शिहान रवींद्र सुर्यवंशी ( प्रिन्सिपल इंस्ट्रक्टर शितो स्काय इंडिया ) व सेन्सेई आदिल सय्यद (डिस्ट्रिक्ट चीफ इंस्ट्रक्टर अहमदनगर ) व  सेन्सेई तेजस रासकर याचे मार्गदर्शन लाभले . अहमदनगर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वाडिया पार्क येथे भव्य कराटे प्रीमियर लीग २०२१ चा आयोजन करण्यात आले होते. यावेळी  स्पर्धेचे पंच म्हणून आदिल सय्यद , वैभव देशमुख , अमित बडदे , जतेस रासकर , आदित्य शिरसगर , सूरज गुंजाळ आदी उपस्थित होते . यावेळी स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना शितो रियो सपोर्ट कराटे – डो इंटरनॅशनल  इंडिया  संस्थेच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले असून विजेता खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले आहे.

karate-premier-league- shito-sky-players-won-11-gold-medals

कपिल शर्मा ने घेतला होता आत्महत्या करण्याचा निर्णय , शाहरुख आला मदतीला धावून

सुवर्ण पदक आणि  रौप्य पदक विजेत्यांची नावे खालील प्रमाणे
सुवर्ण पदक
१) ऋत्विज विनोद राऊत
२) गौरी गोवर्धन सरोदे
३) पल्लवी गजानन निर्मल
४) श्रद्धा अविनाश  लोखंडे
५) फाल्गुनी प्रवीण भोरे
६) तेजस्विनी सीताराम जाधव
७) संजीवनी गोकुळ जाधव
८) जिवेश प्रवीण भोरे
९) कार्तिक गजानन निर्मल
१०) संदेश शरद पंचमुख
११) स्वप्नुजा विलास सकट
रौप्य पदक
१) रोहिणी महेंद्र भवरे
२) सूरज विठोबा जाधव
३) गणेश भाऊसाहेब वाडेकर
४) सूरज चंद्रकांत खंडागळे
Related Posts
1 of 65
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: