कपिल शर्मा ने घेतला होता आत्महत्या करण्याचा निर्णय , शाहरुख आला मदतीला धावून

0 329

 नवी मुंबई –    आपल्या विनोदी शैलीमुळे संपूर्ण देशात प्रसीद्ध झालेला कपिल शर्मा (Kapil Sharma) याने आतपर्यंत ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’(Comedy Nights with Kapil)  आणि ‘द कपिल शर्मा शो’(The Kapil Sharma Show) चे सूत्रसंचालन करत अनेकांच्या मनात घर केले आहे. कपिल आपल्या विनोदी टाईमिंगसाठी ओळखला जातो. हाच कपिल आपल्या सुरुवातीच्या काळात आत्महत्या करण्याचा विचार करत होता असा धक्कादायक खुलासा त्याने नुकताच एका मुलाखतीमध्ये केला आहे. (Kapil Sharma had decided to commit suicide, Shah Rukh came to the rescue)

करिअरच्या सुरुवातीला त्याला सतत नकार मिळत होता. त्यामुळे त्याने मद्यसेवन करण्यास सुरुवात केली होती. तसेच त्याला नैराश्याचा देखील सामना करावा लागला होता. एक वेळ तर अशी होती की कपिलने आत्महत्या करण्याचा विचार केला होता. मात्र त्याच वेळी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख (Shah Rukh Khan) कपिलच्या मदतीला धावून आला. त्याला मार्गदर्शन केले. असा देखील त्याने या मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.

“हा” तर ट्रेलर आहे म्हणत भाजपा खासदार रंजिता कोळी यांच्या घरावर हल्ला

Related Posts
1 of 96

करिअरमध्ये सुरुवातीला कपिलला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागत होता. त्याच दरम्यान कपिलने मद्यसेवन करण्यास सुरुवात केली. आत्महत्या करण्याचे विचार कपिलच्या डोक्यात येत होते. त्याचवेळी शाहरुख आणि कपिलची ओळख झाली. शाहरुखने कपिलला समजावले आणि या सर्वातून बाहेर काढले. शाहरुखने मदत केल्यानंतर कपिल शर्माचे आयुष्य पुन्हा रुळावर आले होते. (Kapil Sharma had decided to commit suicide, Shah Rukh came to the rescue)

हे पण पहा –  फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग, पहा हा भीषण आगीचा व्हिडिओ

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: