“कंगनाला पुरस्कारांची नाही उपचाराची गरज आहे” राष्ट्रपतींना पत्र

0 346

नवी मुंबई – आपल्या नेहमी सतत वेगवेगळ्या वादग्रस्त विधानाने चर्चेत राहणारी बॉलीवुड (Bollywood) अभिनेत्री कंगना राणावत ( Kangana Ranaut) यांनी भारताच्या स्वतंत्र बद्दल केलेल्या विधानामुळे ती चांगलीच अडचणीत सापडली आहे.(“Kangana needs treatment, not rewards” letter to President)

या प्रकरणात तिच्यावर बॉलीवूड सह संपूर्ण देशातून टीका होत आहे अनेक राजकीय पक्षांनी तिला भेटलेल्या पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारने परत घ्यावे अशी मागणी देखील केली आहे. याच प्रकरणात आता दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी राष्ट्रपती रामनाथ गोविंद ( President Ramnath Govind) यांना पत्र लिहीत कंगना कडून पद्मश्री पुरस्कार घेण्याची मागणी केली आहे.

ही पहिलीच वेळ नाही. कंगनाला पुरस्कारांची नाही उपचाराची गरज आहे. कंगना रणौत सवयीने तिच्याच देशातील लोकांविरुद्ध विष ओतते आणि ज्यांच्याशी ती सहमत नाही त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी वारंवार अपमानास्पद भाषा वापरते,’ असे स्वाती मालीवाल म्हणाल्या.

त्यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे की अभिनेत्रीचे विधान महात्मा गांधी, भगतसिंग आणि देशासाठी प्राण अर्पण करणार्‍या आमच्या महान स्वातंत्र्यसैनिकांबद्दलचा तिचा द्वेष दर्शवते. आपल्या महान स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदान आणि हौतात्म्याने आपल्या देशाला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले हे आपण सर्व जाणतो. कंगना रणौत यांच्या विधानांनी लाखो भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत आणि त्या देशद्रोही स्वभावाच्या आहेत असे पत्रात म्हटले आहे.

Related Posts
1 of 1,672

Cryptocurrency वर बंदी येणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

तसेच ‘ब्रिटिश राजवट आणि त्यानंतर झालेल्या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी जालियनवाला बागेत जमलेल्या हजारो लोकांना आपण कसे विसरू शकतो? आपल्या इतिहासातील ही प्रकरणे ‘भीख’ आहेत का?,’ असा सवालही स्वाती मालीवाल यांनी आपल्या पत्रातून विचारला आहे.(“Kangana needs treatment, not rewards” letter to President)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: