ज्युनिअर अभिनेत्रीवर दिग्दर्शकाकडून बलात्कार; समोर आली धक्कादायक माहिती

0 356
Junior actress raped by director; Shocking information came to the fore

प्रतिनिधी DNA मराठी टीम 

पुणे-  पुणे (Pune) जिल्ह्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) शाळेमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होते. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. तर पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात एका दिग्दर्शकाने (Director) ज्युनिअर अभिनेत्रीवर (Junior actress) बलात्कार (Rape) केल्याची घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. दिग्दर्शकाने या ज्युनिअर अभिनेत्रीला पार्टीच्या बहाण्याने बोलावून बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. हि ज्युनिअर अभिनेत्री १७ वर्षांची असल्यापासून आजपर्यंत या दिग्दर्शकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडितेने केली आहे.

Related Posts
1 of 2,248

अमित प्रेमचंद सिटलानी (वय ४०) असं या दिग्दर्शकाचं नाव असून त्याच्याविरोधात विश्रांतवाडी इथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित सिटलानी हा सन फिल्म्सचा कास्टिंग डायरेक्टर आहे. काम मिळवून देण्याच्या बहाण्याने त्याने पीडितेवर वारंवार अत्याचार केले. इतकंच नाहीतर तर अत्याचाराचे व्हिडिओ शूट करून ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचंही पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. या सगळ्यावर आता पोलीस चौकशी करत असून आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: