रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर

0 371

 अहमदनगर –  यशस्वी महिला ब्रिगेडचे अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कार्यकर्ता (NCP) रेखा जरे (Rekha Jare) हत्याकांड (Murder) प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे (Bal Bothe)  याचा जामीन अर्ज अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने नामंजूर केला आहे. आज झालेल्या सुनावणीत अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

प्रकरण काय

३० नोव्हेंबर २०२० रोजी पुणे येथून अहमदनगर मध्ये येताना जाते गावाच्या घाटात यशस्वी ब्रिगेडचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कार्यकर्ता रेखा जरे  यांची निघून हत्या करण्यात आली होती. यानंतर या प्रकरणात अहमदनगर पोलिसांनी कारवाई करत अवघ्या तीन दिवसात या हत्या मागील पाच आरोपींना अटक करून पत्रकार बाळ बोठे या हत्यामागील मुख्य सूत्रधार आहे हे सार्वजनिक केले होते.

बोठे फरार घोषित –

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे  पोलिसांच्या हाती येत नसल्याने त्याला फरार घोषित करण्यासाठी पोलिसांनी पारनेर न्यायालयात अर्ज दाखल केला होता या अर्जावर सुनावणी करत पारनेर न्यायालयाने पत्रकार बाळ बोठे याला ४ मार्च २०२१ रोजी फरार घोषित केले.

१०२ दिवसांनंतर बाळ बोठेला अटक –

मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अखेर १०२ दिवसानंतर अहमदनगर पोलिसांनी हैदराबाद मधील बिलालपुर येथून अटक केली . बोठे याच्या बरोबर जिल्हा पोलिसांनी त्याला मदत करणाऱ्या इतर चार आरोपींना देखील अटक केली होती .
Related Posts
1 of 1,622

भिंगारची ओळख ऐतिहासिक वेस पुनर्बांधणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: