भक्ती एजन्सीने जोपासली सामाजिक बांधिलकी, अनाथ आश्रमा साठी दिली बोरवेल मोटर भेट

श्रीगोंदा :- समाजाच्या प्रती आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून व आपण स्वतःही शेतकरी कुटुंबातून गरीब परिस्थितीतून आलो असून समाजाच्या ऋनातून उतराई होण्यासाठी बाबुर्डी तालुका पारनेर येथील पैलवान युवा उद्योजक अरविंद दिवटे यांनी ढवळगाव तालुका श्रीगोंदा येथील फुले-शाहू-आंबेडकर विचारक बहुउद्देशीय संस्था संचलित आश्रय अनाथ बालसंगोपन वसतिगृहच्या बांधकामाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समजली होती व त्यांनी संस्थेचे काम पाहून संस्थेचे अध्यक्ष अमोल बोरगे यांना संपर्क करून अनाथ वस्तीगृहाच्या बांधकामासाठी बोरवेल विद्युत मोटर देऊन मोलाची मदत केली, लोकसहभागातून संस्थेने बोरवेल घेतला होता बोरवेलला मुबलक पाणी लागले होते, मोटर टाकण्यासाठी संस्थेकडे आर्थिक मदत नव्हती,ही माहिती भक्ती एजन्सीचे अरविंद दिवटे यांना समजली व त्यांनी संस्थेला बोरवेलची विद्युतमोटार संस्थेला देऊ केली.
संस्थेचे रुमचे बांधकाम चालू असल्यामुळे या मोटरी मुळे बांधकामासाठी मोलाची मदत होणार असून भविष्यामध्ये अनाथ मुलांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी मदत होणार आहे. अरविंद दिवटे यांचे सुपा तालुका पारनेर येथे भक्ती एजन्सी नावाने शेतीच्या निगडित उपकरणांचे होलसेल दुकान आहे. ते नेहमीच सामाजिक कामांमध्ये सक्रिय असतात, त्यांनी दिलेल्या या मदती बद्दल संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.केशव कातोरे व सचिव जयेश रुणवाल यांनी अरविंद दिवटे यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी श्री.ज्ञानदेव जगताप,ग्रामपंचायत सदस्य बाबुर्डी प्रमोद दिवटे,पै.तानाजीभाऊ उघडे,रायतळे चे सरपंच अंकुश रोकडे, सुपा उपसरपंच दत्तानाना पवार,सुपा ग्रामपंचायत सदस्य पप्पूशेठ पवार,मा.सरपंच विजय शिंदे ग्रा.पं.सदस्य राहुल बोरगे,ग्रा.पं.सदस्य बाळासाहेब शिंदे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल बोरगे उपस्थित होते.