Jobs सरकारी बँकेत भरती सुरू, जाणून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया

0 196

नवी मुंबई  –  देशात आलेल्या कोरोना (Corona virus) महामारी नंतर अनेक जणांना आपली नोकरी (Jobs) सोडावी लागली. आयटी क्षेत्र असो किंवा बँक क्षेत्र प्रत्येक क्षेत्रातून जॉब गेली आहे. देशात कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने परत एकदा जॉब साठी संधी उपलब्ध होत आहे. ज्या तरुणांना बँकेत नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) ने स्पेशलिस्ट ऑफिसर्सच्या विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.  या भरतीसाठी  इच्छुक उमेदवार 23 नोव्हेंबर 2021 पासून या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. बँकेत अर्थशास्त्रज्ञ, प्राप्तिकर अधिकारी, माहिती तंत्रज्ञान, आर्थिक विश्लेषक, कायदा अधिकारी यासह 115 पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. (Jobs Recruitment in Government Bank, Learn the entire application process)


ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख-

23 नोव्हेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख-

17 डिसेंबर 2021
कॉल लेटर डाउनलोड करण्याची शेवटची तारीख – 

11 जानेवारी 2022

परीक्षेची तारीख-

22 जानेवारी 2022

उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की या तात्पुरत्या तारखा आहेत, ज्या बँक कधीही बदलू शकते.

या पदांसाठी होणार भरती 

इकॉनॉमिस्ट- 1

इनकम टॅक्स ऑफिसर- 1

इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी- 1

डाटा साइंटिस्ट IV – 1

क्रेडिट ऑफिसर III – 10

डाटा इंजीनियर III – 11

आईटी सिक्योरिटी एनालिस्ट III – 1

आईटी एसओसी एनालिस्ट III – 2

रिस्क मैनेजर III – 5

टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट) III – 5

फाइनेंशियल एनालिस्ट II – 20

इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी II – 15

लॉ ऑफिसर II – 20

रिस्क मॅनेजर II – 10

सिक्योरिटी II – 3

सिक्योरिटी I – 1

 अप्लीकेशन प्रोसेस

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार आवश्यक कागदपत्रांसह अधिकृत वेबसाइट centerbankofindia.co.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून 17 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. उमेदवारांना भरती परीक्षेला बसावे लागेल. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाण्याची शक्यता आहे.(Jobs Recruitment in Government Bank, Learn the entire application process)

चक्क नवविवाहित काकीला पुतण्याने नेले पळवून , गुन्हा दाखल

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: