
दुसरीकडे, जेएनयूएसयूचे माजी अध्यक्ष साई बाला यांनी दावा केला आहे की, अभाविपने विद्यार्थ्यांना मांसाहार करण्यापासून रोखलं आहे. नवरात्रीमध्ये विद्यार्थ्यांना नॉनव्हेज खाण्यापासून रोखण्यात आलं होतं, असं साई बाला यांनी म्हटलं. साई बाला यांनी अभाविपने विद्यार्थ्यांना मेसमध्ये नॉनव्हेज खाण्यापासून रोखल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचवेळी अभाविपकडून या आरोपांचे खंडन करण्यात आलं आहे. हा व्हिडिओ जेएनयूच्या कावेरी हॉस्टेलमधील आहे.
एन साई बाला यांनी ट्विट करुन लिहिलं की, ABVP च्या गुंडांनी कावेरी हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना नॉनव्हेज खाण्यापासून रोखलं. जेएनयूचे कुलगुरू या गुंडगिरीचा निषेध करणार का? आता विद्यार्थ्यांच्या जेवणाचा निर्णय होणार का? मेसच्या सेक्रेटरीलाही मारहाण करण्यात आली, या गुंडगिरीविरोधात उभे राहण्याची वेळ आली आहे. भारताच्या विचारसरणीवर हल्ला होत आहे.
अभाविपनं एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनात अभाविपनं स्पष्टीकरण दिलं आहे. जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी रामनवमीनिमित्त कावेरी हॉस्टेलमध्ये पूजा आणि हवनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. पूजेला जेएनयूचे विद्यार्थी आणि मुली मोठ्या संख्येनं जमले होते. त्याचवेळी डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येऊन पूजेत अडथळा आणला आणि विरोध करण्यास सुरूवात केली. त्यांनी संपूर्ण प्रकरण राईट टू फूड आणि व्हेज-नॉन-व्हेजभोवती फिरवण्याचा प्रयत्न केला.