
नगर ः जिल्हा मराठा पतसंस्थेची (Jilha Maratha Pith Sanstha) निवडणूक जाहीर झालेली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या पतसंस्थेची निवडणुकीकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागले असून या संस्थेवर वर्चस्व मिळविण्यासाठी मराठा समाजातील दिग्गज आता प्रयत्न करीत असून अनेकजणांनी गुडघ्याला बाशिंग बांधलेले आहे.
व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करणाऱ्यावर गुन्हा Blackmail based on video
जिल्हा मराठा पतसंस्थेच्या (Jilha Maratha Pith Sanstha) 12 जागा सर्वसाधारण प्रतिनिधी, अनुसूचित जाती-जमाती एक, महिला प्रतिनिधी दोन, इतर मागास वर्गीय एक, भटक्या विमुक्त जाती, जमाती विशेष मागास प्रवर्ग एक या एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. शनिवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरवात झालेली आहे. अंतिम मुदत 24 मार्चपर्यंत आहे. अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत मुदत आहे.
जुनी पेन्शनसाठी भरलेल्या शाळा सोडल्या… A few schools were filled in a row in the city.
दाखल झालेल्या अर्जांची यादी 24 मार्चला प्रसिध्द करण्यात येईल. त्याच दिवशी दुपारी चार वाजता नामनिर्देशन पत्रांची छाननी 27 मार्चला करण्यात येणार आहे. त्यानंतर 28 मार्चला उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. 28 मार्च ते 11 एप्रिलपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मदत आहे. त्यानंतर 12 एप्रिलला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येईल. त्यानंतर चिन्हांचे वाटप करण्यात येईल. 23 एप्रिलला मतदान होणार आहे. हे मतदान सकाळी आठ ते दुपारी चारर्यंत होणार आहे. त्यानंतर मतमोजणी होणार आहे.