जवळा सोसायटी निवडणूक; ऊसतोड मजूर रुपचंद आव्हाड सर्वाधिक मतदान घेऊन सभापती पुत्राचा केला पराभव

0 1,202
Javaḷa Society Election; Ustod Mazur Rupchand Awhad defeated the Speaker's son by getting the highest number of votes
 प्रतिनिधी – अशोक निमोणकर
जामखेड – जवळा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत अनुसूचित जाती मतदारसंघातून ऊसतोड मजूर रूपचंद आव्हाड यांनी सर्व विजयी उमेदवारांपेक्षा सर्वाधिक ८४६ मते घेवुन विजयी झाले तसेच त्यांनी विरोधी आघाडीचे पॅनेलप्रमुख पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष आव्हाड यांचे पुत्र सुशिल आव्हाड यांचा पराभव केला. जायंट किलर ठरलेले ऊसतोड मजूराने सभापतीपुत्राचा केलेला पराभव तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
Related Posts
1 of 2,208
जामखेड तालुक्यातील जवळा सोसायटी ४८ सोसायटीपैकी सर्वात मोठी असून सभासद संख्या १६६७ तर कर्जवाटप १२ कोटीच्या आसपास आहे. त्यामुळे या सेवा संस्थेची निवडणूक जिल्ह्यात गाजली होती. या निवडणुकीत चेअरमन आजीनाथ हजारे, उपसभापती दिपक पाटील, दत्तात्रय कोल्हे, आदिनाथ कारखान्याचे संचालक राजेंद्र पवार, माजी संचालक डॉ. महादेव पवार, प्रशांत पाटील यांच्या सर्वपक्षीय प्रणित शेतकरी विकास आघाडी ने सर्व १३ जागा दोनशेच्या फरकाने जिंकून पं. स. माजी सभापती सुभाष आव्हाड व युवा नेते प्रशांत शिंदे यांच्या मंडळाचा पराभव केला होता.
मात्र पराभूत उमेदवारांमध्ये सभापती सुभाष आव्हाड यांच्या मुलगा सुशील आव्हाड यांचा पराभव एक उसतोडणी मजूर असलेले रूपचंद आव्हाड यांनी त्यांचा २३० मतांनी पराभव केला. रूपचंद आव्हाड हे शेतकरी मंडळाचे प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. शेतकरी विकास आघाडीच्या विजयी सर्व १३ उमेदवारांमध्ये रूपचंद आव्हाड यांना सर्वाधिक ८४६ मते आहेत तर शेतकरी विकास आघाडीचे दुसरे उमेदवार भटक्या जाती जमाती मतदारसंघातील मच्छिंद्र सूळ हे दुस-या क्रमांकाचे उमेदवार ठरले आहेत. त्यांना ८३३ मते मिळाली तर इतर अकरा उमेदवारांना ७९० ते ८२३ च्या आसपास मते पडले. यामुळे ह्या निवडणुकीत आरक्षीत जागेचा बोलबाला राहिला.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: