दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस जामखेड पोलिसांनी केली अटक

0 11

जामखेड –  दरोडा व खुनाच्या गुन्ह्य़ात चार वर्षापासून फरार असलेले तालुक्यातील सोनेगाव व घोडेगाव येथील राहणारे दोन आरोपी पोलीसांनी सापळा रचून अटक केली. मागील काही दिवसांपासून फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याची मोहीम जामखेड पोलीसांची चालू आहे त्यानुसार तालुक्यात आत्तापर्यंत १३ जणांना अटक केली आहे.

                                               जमीन खरेदीत इसमाची १ कोटी ५५ लक्ष रुपयांना फसवणूक..

याबाबत मिळालेली माहिती अशी की पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाली की दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जगन्नाथ येडबा जाधव रा. सोनेगाव ता. जामखेड तसेच खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यातील फरार आरोपी बाळू शिवाजी रावण रा. घोडेगाव ता. जामखेड हे खर्डा परिसरात आली आहेत अशी माहिती मिळाल्यावरून तात्काळ पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी खर्डा दूरक्षेत्र येथील पोलीस अंमलदार पोना शेंडे, पो .कॉ साखरे व मस्के यांना सूचना देऊन रवाना केले .

पोलीस अधीक्षकांचा दणका ,अखेर पाटील निलंबित …………..

Related Posts
1 of 1,290

पोलीसांनी शिताफीने फरार आरोपी खर्डा गावचे शिवारातून ताब्यात घेऊन आरोपीस अटक केली. आरोपीचे  जगन्नाथ येडबा जाधव यांचे विरुद्ध जामखेड पोलीस स्टेशन  भा . द. वि ३९५  प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. व सदर आरोपी चार वर्षापासून फरार झालेला होता तसेच आरोपी बाळू शिवाजी जाधव याच्यावर भा.द. वि कलम ३०७ प्रमाणे खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असून तो गेल्या दोन वर्षापासून फरार होता. दोन्ही गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आलेली असून अधिक  तपास जामखेड पोलिस स्टेशन सहा पोलीस निरीक्षक सुनील बडे व पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात करीत आहेत.

कोरोना रजेवर असताना हत्येचा प्रयत्न करुन फरार झालेला आरोपीला धुळे येथून अटक 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: