पोलीस मुलाचे क्रूरकर्म झाकण्यासाठी वडिलांवर आली पाय पकडण्याची वेळ

श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातील काष्ठी लिंपणगाव रोडवरील हॉटेल अनन्या जवळ पोलिसांनी गुटख्यावर कारवाई केली पण ती पोलिसांच्या चांगलीच अंगलट आली आहे. या कारवाईत अनमोल करामती करणाऱ्या पोलिसाचे क्रूरकर्म झाकण्यासाठी पोलिसांच्या आई वडील याना दुसऱ्याचे पाय पकडण्याची वेळ आली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव काष्ठी येथील हॉटेल अनन्या जवळ श्रीगोंदा पोलिसांनी दूतर्फी भूमिका बजावत कारवाई केल्याने ही कारवाई पोलिसांच्या चांगलीच अंगलट आली आहे. याबाबत गेल्या काही दिवसांपासून वर्तमानपत्रातून बातम्या झळकत आहेत तरीही पोलीस प्रशासन याबाबत बघ्याची भूमिका बजावताना दिसत आहेत या कारवाई मुळेपोलिसांची अनेक प्रकरणे समोर आली आहेत त्यामुळे आता पोलिसांवर कारवाई होणार असे लक्षात आल्यावर त्या कारवाई मधील एका पोलिसाने घडलेला सर्व प्रकार आई वडील यांना सांगितला.
Related Posts
त्यावेळी आई वडील यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कान उघडणी करण्यात आली पूर्वी कथानकात सांगितले आहे की श्रावण बाळ याने खांद्यावर कावडीत बसवून काशीची तीर्थ यात्रा घडवून आणली होती त्यास लोकांनी पूजनीय केले पण आजच्या जगात श्रावणबाळ याने केलेले पाप झाकण्यासाठी आई वडील याना पाय पकडण्याची वेळ येते हे सर्व निंदनीय आहे. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सर्वानी मिळून तालुक्याची राजधानी असलेल्या गावात जाऊन पाय धरून माफी मागण्याचे ठरले त्यानुसार दुसऱ्या दिवशी तो पोलीस आपल्या म्हताऱ्या आई वडिलांना घेऊन तालुक्याच्या राजधानीत पोहचले मात्र ज्याचे पाय धरायला गेले होते त्याला हा प्रकार माहीत झाला त्याला म्हताऱ्या माणसांनी आपले पाय धरावेत इतके आपण मोठे नाहीत.
त्यामुळे सदर इसम त्या ठिकाणी त्यांना भेटलाच नाही पण आपल्या पोलीस मुलाचे क्रूरकर्म झाकण्यासाठी आई वडिलांवर पाय धरण्याची वेळ आणणारा हा जगातील पहिलाच मुलगा असेल असे खुलेआम बोलले जात आहे