सत्ता आणि पदासाठी भीक मागणे ही आपली संस्कृती नाही – पंकजा मुंडे

0 151

बुलढाणा –  भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (BJP National Secretary Pankaja Munde) यांनी बुलढाणा (Buldhana) येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना कोणासमोर हात पसरून सत्ता, पद आणि पदासाठी भीक मागणे ही आपली संस्कृती नाही. माझे वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी आम्हाला पद किंवा सत्तेसाठी भीक न मागण्याची शिकवण दिली आहे असे म्हटले आहे.  नुकतेच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने नवीन सरचिटणीसांची यादी जाहीर केली आहे . त्यानंतर पंकजा मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे अनेक राजकीय चर्चाना उधाण आले आहे. (It is not our culture to beg for power and position – Pankaja Munde)

भाजपाकडून आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी नुकतीच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, पंकजा मुंडे व विनोद तावडे यांना संधी मिळालेली नाही. दरम्यान, तावडेंना भाजपाकडून राष्ट्रीय स्तरावर मोठी जबादारी देत, अखिल भारतीय सरचिटणीस म्हणून नियुक्त केले गेले आहे. त्यामुळे आता पुन्हा पंकजा मुंडे यांना डावलल्याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत पंकजा मुंडेनी एका कार्यक्रमात प्रतिक्रिया दिली आहे. मला एखादे पद दिले की नाही याने काही फरक पडत नाही. महत्त्वाचे म्हणजे मला सामाजिक कार्य आणि गरिबांची सेवा करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. हे वचन मी माझ्या वडिलांना दिले होते असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.

हे पण पहा – बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पोलिसांनी पकडला..

Related Posts
1 of 1,512

याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे व विनोद तावडे यांना देखील प्रतिनिधित्व मिळेल. बावनकुळेंना दोन वर्षानंतर प्रतिनिधित्व मिळालं, त्यांनीही मिळेल. आम्ही सगळेजण संघटनेतील जबाबदारी आणि निवडणुकीची जबाबदारी यामध्ये संघटनेची जबाबदारी जास्त महत्वाची मानतो. त्यामुळे आता अखिल भारतीय सरचिटणीस ही जबाबदारी एवढी मोठी जबाबदारी आहे, की त्यापुढे त्यांचे दोन वर्षांपूर्वी तिकीट कापलं हा विषय मागे पडतो तरीही, राजकारणात राहणारा माणूस हा शेवटी निवडणुका लढवण्यासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी, संविधानिक पदावर जाण्यासाठी इच्छुक असतो. बावनकुळेंचं झालं, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांचे देखील होईल. या वर्षभरात खूप वाव आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.  (It is not our culture to beg for power and position – Pankaja Munde)

फडणवीस यांनी वादग्रस्त वक्तव्य करून काड्या करू नये – संजय राऊत

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: