परप्रांतीय इसम ‘त्या’ अल्पवयीन मुलीला 6 महिन्यांपासून त्रास देत होता..!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंद्यातील रहिवाशी असलेल्या पीडित मुलीला.. तिच्या चुलत भावाकडे काम करण्यासाठी आलेला छत्तीसगड येथील इसम सतत घरापासून जाता-येता तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करत, हसून खुणवत असे.. वारंवार होणाऱ्या या घटनेबाबत मुलीने तिच्या आई-वडिलांना सांगितले होते. यावर त्यांनी नमूद व्यक्तीला समजावून सांगितले. मात्र, त्याचे नमूद कृत्य थांबले नाही.दिनांक 7 मे 2022 रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास जेवण झाल्यानंतर नमूद अल्पवयीन मुलगी नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर गेली असता, तिला त्या व्यक्तीने पाठीमागून मिठी मारत, लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
यानंतर पीडित मुलीने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात येऊन नमूद इसमा विरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार त्या परप्रांतीय इसमावर भादवि कलम 354, 509 तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 चे 8 व 12 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.