गुपचूप तुमचा कॉल रेकॉर्ड होत तर नाही ना ?; जाणून घ्या ‘या’ ट्रिकने

मुंबई – नुकताच गुगलने (Google) मोठा निर्णय घेत प्ले स्टोर (Play Store) वरून सर्व कॉल रेकॉर्डिंग (Call recording) अॅप्सला बंद केले आहे . यामुळे आता यूजर्सला (Users) प्ले स्टोरवर कॉल रेकॉर्डिंगचा पर्याय मिळणार नाही. मात्र तरीदेखील काही ट्रिक वापर करून आता देखील तुमचा कॉल रेकॉर्डिंग होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला कोणी कॉल रेकॉर्डिंग करत असले तर या माहितीच्या आधारे तुम्ही ते थांबू शकतात.
Related Posts
वारंवार Beep चा आवाज येणे
अनेक देशांमध्ये परवानगी न घेता कोणाचाही कॉल रेकॉर्ड करणे बेकायदेशीर मानले जाते. त्यामुळे बहुतांश मोबाइल फोन मॅन्यूफॅक्चरर आपल्या डिव्हाइसमध्ये बीप साउंड देतात. यामुळे कोणीही तुमचा कॉल रेकॉर्ड करत असल्यास, वारंवार बीप टोन वाजते. जर एखाद्याशी फोनवर बोलताना तुम्हाला अनेकदा हा आवाज ऐकू येत असेल, तर समजून जा की तुमचा कॉल रेकॉर्ड केला जात आहे. मात्र, हे फीचर सर्वच फोन्समध्ये काम करत नाही.

जोरात Beep साउंड देखील एक सिग्नल
अनेकदा यूजर्सला सिंगल बीप साउंड देखील ऐकू येतो. परंतु, असे खूप कमी वेळा होते. एखादी व्यक्तीने कॉल रेकॉर्ड करण्यास सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या यूजरला सिंगल बीप साउंड ऐकू येतो. हा आवाज कॉल रेकॉर्डिंग सुरू झाल्याचे संकेत आहे. हे फीचर जास्त करून फीचर फोन्समध्ये पाहायला मिळते. अनेकजण कॉलला स्पीकरवर ठेवून देखील रेकॉर्ड करतात. कॉल स्पीकरवर ठेवून इतर फोन्समध्ये रेकॉर्ड करण्यासाठी थर्ड पार्टी अॅपची देखील गरज नसते. दरम्यान, गुगलने काही दिवसांपूर्वीच आपल्या प्लॅटफॉर्मवरून सर्व रेकॉर्डिंग अॅप्सला हटवले आहे. त्यामुळे गुगल डायलर वापरणाऱ्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला कॉल रेकॉर्डिंगचा पर्याय मिळणार नाही.