नवाब मलिक पेक्षा संजय राऊत जास्त महत्वाचे आहेत का?; शरद पवारांना इम्तियाज जलील यांचा सवाल

0 182
Is Sanjay Raut more important than Nawab Malik ?; Imtiaz jaleel's question to Sharad Pawar
 मुंबई –   देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय (NCP) अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र या भेटीवर प्रतिक्रिया देतांना शरद पवार यांनी महाराष्ट्रात सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) कारवायांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती दिली तसेच याभेटीमध्ये संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मालमत्ता जप्तीचा मुद्दा उपस्थित करत ‘ईडी’च्या कारवाया अन्यायकारक असल्याचं मुद्दा शरद पवार यांनी उपस्थित केला. तसेच याभेटीमध्ये नवाब मलिक यांचा मुद्दा उपस्थित केला नसल्याची माहिती देखील शरद पवार यांनी दिली आहे.
आता या माहितीवरूनच  एमआयएमचे(MIM) खासदार  इम्तियाज जलील (Imtiyaz jaleel)यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधत संजय राऊतांच्या अटकेनंतर इतक्या घाईने पंतप्रधानांसमोर मुद्दा उपस्थित करणाऱ्या शरद पवारांना नवाब मलिकांपेक्षा ते जास्त महत्वाचे वाटतात का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.  एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी शरद पवारांनी संजय राऊतांचा मुद्दा पंतप्रधानांसोबत चर्चेस नेल्याने भुवया उंचावल्या आहेत. “शरद पवारांनी इतकी घाई त्यांच्या पक्षाचे नवाब मलिक अटक झाल्यानंतर का दाखवली नाही?”, अशी विचारणा त्यांनी केली आहे.

इम्तियाज जलील यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “फक्त संजय राऊतांबद्दल चर्चा? का? तुमच्या पक्षाचेच मंत्री नवाब मलिक यांना अटक झाली तेव्हा तुम्हाला इतक्या गडबडीत मोदींशी चर्चा करावीशी वाटली नाही? की संजय राऊत नवाब मलिकांपेक्षा जास्त महत्वाचे आहेत. तुमच्याकडे खेळण्यासाठी स्वतःचे खेळ आहेत”

Related Posts
1 of 2,459

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त करण्याच्या ‘ईडी’च्या कारवाईबद्दल पवार यांनी पत्रकार परिषदेत कमालीची नाराजी व्यक्त केली. राऊत यांच्याविरोधातील कारवाईचा मुद्दा मोदींच्या भेटीत उपस्थित केल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. संजय राऊत यांच्याविरोधात कारवाई करण्याची काय गरज होती? ते भाजपवर कठोर टीका करतात म्हणून त्यांची संपत्ती जप्त करण्याची ईडीची कारवाई अन्यायकारक असल्याचे पवार म्हणाले. संजय राऊत यांच्या पत्नीचे अलिबागमधील भूखंड व दादरमधील सदनिका ईडीने जप्त केली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: