
श्रीगोंदा :- श्रीगोंदा (Shrigonda) काष्ठी रोडवर हॉटेल अन्यन्या जवळ पोलिसांनी गुटखा (Gutkha) कारवाई केली त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता पण त्या गुन्ह्याच्या तपासाचे पुढे काय झाले याबाबत परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
श्रीगोंदा पोलिसांनी फिर्यादीत म्हटले आहे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त महितीदारकडून माहिती मिळाली आणि पोलिसांनी कारवाई करून गुटखा पकडला असे फिर्यादीत नमूद केले असले तरीही घटनास्थळी पोलीस आगोदरच हजर होते त्यांनी हॉटेल अनन्या जवळील गोडावून मध्ये खाली होणार 12 टायर ट्रक मधील गुटखा 2 पीक अप भरून तालुक्यातील विविध ठिकाणी पाठवला जाणार होता मात्र अहमदनगर पोलीस अधीक्षक यांचे गुन्हे प्रकटीकरण पथक कारवाई साठी येणार असल्याची माहिती श्रीगोंदा पोलिसांना मिळताच पोलिसांनी पुढील नियोजन आखले एका पोलिसाने दुसऱ्या पोलिसाला विचारले आता काय करायचे त्यावेळी त्यातील एक जण म्हणाला की काही काळजी करू नये मी सर्व काही पाहून घेतो असे म्हटल्यावर सर्व सर्वांनुमते गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर DNA मराठी मधून बातम्या झळकल्या नंतर नाशिक परिक्षेत्र पोलीस महासंचालक यांच्या आदेशाने अहमदनगर पोलीस अधीक्षक यांनी पोलीस शिपाई अमोल अजबे याच्यावर कारवाई करत मुख्यालयी जमा करण्यात आले त्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर अभंग म्हणून निवड करण्यात आली मात्र या गुन्ह्याबाबत तपासात पुढे काय झाले हे मात्र समजण्यास तयार नाही मात्र तपासात काहीतरी गौडबंगाल पोलिसांच्या हाती लागले असल्याची चर्चा होताना दिसत आहे त्यामुळे काही नागरिक गुटख्याचा तपास थांबलाय का ? असा प्रश्न उपस्थित करीत आहेत.
Related Posts
तपासी अधिकारी यांनी काय केले?
गुटखा प्रकरणात भादवी 328 नुसार गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी बनावट आरोपी जेरबंद केला होता त्यावेळी त्या आरोपीने काही पोलिसांची तसेच खाजगी एसमानची नावे घेतली होती त्याचे तपासी अधिकारी यांनी नेमके केले तरी काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कुरघोडी थांबवा ?
गुटखा प्रकरण थांबविण्यासाठी पोलीस यांच्यासह आरोपी सुध्दा हे प्रकरण हे प्रकरण थांबविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करून एकमेकांवर मोठ्या प्रमाणात कुरघोडी करत असल्याचे पोलीस स्टेशनचे वातावरण मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे.