IPL2022: श्रेयस अय्यरची ‘ती’ मोठी चूक KKR ला पडली महाग; हाताची मॅच गेली

0 195
IPL2022: Shreyas Iyer's 'that' big mistake cost KKR dearly; The hand match is over

प्रतिनिधी DNA मराठी टीम 

मुंबई – आयपीएलच्या 15 च्या (IPL 2022) सिझनमध्ये  काल झालेल्या KKR आणि RCB च्या सामना अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये जाऊन संपला. या सामन्यात RCB ने KKR वर विजय मिळवला आहे. मात्र या सामन्यानंतर KKR चा कर्णधार श्रेयस अय्यरवर (Shreyas Iyer) अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्याने सामन्यादरम्यान केलेल्या चुकीमुळे KKR पराभव स्वीकारावा लागला असल्याची टीका सोशल मीडियावर (Social Media) होत आहे.

श्रेयसचे निर्णय चुकले

कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे व्यंकटेश अय्यर यांच्यासह सहा असे गोलंदाज त्यांच्याकडे पर्यायाच्या स्वरुपात होते. मात्र, कर्णधारानं घेतलेले बाराव्या ओव्हरपासून 18 व्या ओव्हरपर्यंतचे काही निर्णय चुकल्याचं दिसून आलं. हे निर्णय कोलकाता नाईट रायडर्सला इतके महागात पडले की त्यांना पराजयाचा सामना करावा लागला. तुम्ही जर गोलंदाजा विषयी बोलाल तर आंद्रे रसल याला सोडल्यास जवळपास सगळ्याच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. रसेलने 2.2 ओव्हरमध्ये 36 धावा दिल्या.

Related Posts
1 of 2,487

श्रेयसच्या निर्णयाने नुकसान

कर्णधार श्रेयस अय्यरने रसेलच्या सुरुवातीच्या दोन ओव्हर महागड्या पडल्यानंतर व्यंकेटेश अय्यरकडून 19 व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करुन घेतली. मात्र, हेच कोलकाता नाईट रायडर्सला चांगलंच महागात पडलं. तो 19 व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करायला आला आणि दहा रन त्याने खर्ची घातले. श्रेयस जर व्यंकटेशसोबत स्पिनर्सला 12 ते 15 ओव्हरमध्ये खेळवतो तर कोलकाता नाईट राईडर्ससाठी चांगली गोष्ट असली असती. केकेआरचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याने चार ओव्हरमध्ये 16 रन देऊन 2 विकेट घेतल्या.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: