आयपाीएल रद्द मात्र कोरोनाचा धोका कायम… CSK चा ” हा “स्टार पॉझिटीव्ह

0

नवी मुंबई –  देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजवला आहे. याच दरम्यान देशात सुरु असलेल्या आयपीएलच्या १४ व्या सत्राला स्थगित देण्याचा निर्णय बीसीसीआयने काल दि. ४ मे ला घेतला आहे . आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने बीसीसीआयने हा निर्णय घेऊन स्पर्धा स्थगित केली.

सनरायझर्स हैदराबादचा (SRH ) वृद्धीमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा (DC) अमित मिश्रा या दोघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती . तर आता चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) बॅटींग कोच मायकल हसीला सुध्दा कोरोनाची लागण झाली आहे .  हसीची सोमवारी चाचणी करण्यात आली होती, मंगळवारी त्याचा रिपोर्ट आला. यापूर्वी चेन्नईचा बॉलिंग कोच लक्ष्मीपती बालाजीला कोरोनाची लागण झाली होती .

कोरोना रोखण्यासाठी देशात संपूर्ण लॉकडाउन हा एकमेव उपाय – राहुल गांधी 

हसीचा पहिला रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर दुसऱ्यांदा चाचणी घेण्यात आली त्यावेळी देखील तोच रिपोर्ट आला. त्याची टेस्ट निगेटीव्ह येईल अशी चेन्नईच्या मॅनेजमेंटला आशा होती. यापूर्वी टीमचे सीईओ काशी विश्वनाथ यांचा पहिला रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर त्यांचा दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह आला. चेन्नई सुपर किंग्सची टीम सध्या दिल्लीमध्ये आहे.त्यांनी पहिल्या पाच मॅच मुंबईत खेळल्या होत्या. त्यानंतरच्या दोन मॅच दिल्लीत झाल्या.  त्यांनी सातपैकी पाच मॅच जिंक पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर धडक मारली होती.

Related Posts
1 of 42

करोनाविरुद्धच्या युद्धाची जबाबदारी गडकरींकडे सोपवावी भाजपा खासदाराची मागणी

हसी सुरुवातीपासून चेन्नईचा सदस्य आहे. यापूर्वी तो टीमचा ओपनिंग बॅट्समन होता.त्यानं आयपीएल मध्ये शतक देखील झळकावलं असून तो चेन्नईच्या यशस्वी बॅट्समन पैकी एक आहे. त्यानं एका सिझनमध्ये ऑरेंज कॅप देखील पटकावली होती. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर तो टीमचा बॅटींग कोच बनला.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: