IPL 2022 Schedule ,पुढील वर्षी ‘या’ दिवशी होणार IPL 2022 चा पहिला सामना

0 267

 नवी मुंबई –   2022 मध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या ( IPL) 15 व्या सीझनच्या तारखा बीसीसीआय (BCCI) ने जाहीर केले आहे.  2 एप्रिल पासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेचा पहिला सामना चेन्नईतील चेपॉक (Chepauk) स्टेडिअमवर होईल . बीसीसीआयमध्ये हेही मान्य करण्यात आलं आहे की, पुढील हंगाम 60 दिवसांपेक्षा जास्त काळ चालणार आहे. 4 किंवा 5 जून ही संभाव्य तारीख असल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात अंतिम सामना होणार असल्याची चर्चा आहे. (IPL 2022 Schedule, The first match of IPL 2022 will be played on this day next year)

मिळालेल्या माहितीनुसार यावेळी 10 संघ खेळणार असून एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. यावेळी, सर्व संघ 14-14 सामने खेळतील, ज्यामध्ये सात सामने त्यांच्या घरच्या मैदानावर आणि सात सामने विरोधी संघाच्या घरच्या मैदानावर खेळले जाणार आहेत. आयपीएल स्पर्धेतील पहिल्या मॅचमध्ये गतविजेती चेन्नई सुपर किंग्सची (CSK) टीम खेळणार हे स्पष्ट आहे. त्यांच्या विरुद्ध कोणती टीम खेळेल हे अजून निश्चित झालेलं नाही. पण, 5 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचं (Mumbai Indians) नाव यामध्ये सर्वात आघाडीवर आहे.महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चा पराभव करून आयपीएल 2021 चे विजेतेपद जिंकलं, त्यामुळे गतविजेते असल्याने, CSK पहिल्या सामन्यात पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा सामना करेल.

मोठी बातमी ! जिल्‍ह्यात कलम 144 लागू, जाणून घ्या संपूर्ण माहीती

जय शाह यांनी IPL 2022 भारतात आयोजित करण्याची केली घोषणा :-
बीसीसीआयचे  सचिव जय शाह (Jai Shah) यांनी अलीकडेच IPL 2022 भारतात होणार असल्याची पुष्टी केली. दोन नवीन संघांची भर पडल्याने IPL 2022 ची उत्कंठा आणखी वाढेल, असे ते म्हणाले होते.  गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलचे आयोजन भारताऐवजी UAE मध्ये केले जात आहे. कोरोना व्हायरसमुळे मागील वर्षी संपूर्ण स्पर्धा UAE मध्ये आयोजित करण्यात आली होती, तर यावर्षी आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळवला गेला.(IPL 2022 Schedule, The first match of IPL 2022 will be played on this day next year)

Related Posts
1 of 1,487
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: