
मुंबई – आज आयपीएलमध्ये (IPL 2022) डबल हेडर होणार आहे. दुपारच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) गुजरात टायटन्स (GT) ला भिडणार आहे. हा सामना दुपारी 3.30 ला मुबईमधील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. गुजरात हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये आपला स्थान पक्का करण्यासाठी मैदानात उतरणार आहे तर दुसरीकडे आरसीबी हा सामना जिंकून पुन्हा टॉप 4 मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. आजच्या सामन्यातील दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हन बद्दल जाणून घ्या.
आरसीबी सामन्यात गुजरात टायटन्सवर विजय नोंदवल्यानंतर फाफ डू प्लेसिसच्या संघाला विजयी मार्गावर परतायचे आहे. IPL 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शानदार सुरुवात केली. मात्र शेवटचे 2 सामने सातत्याने गमावल्यानंतर संघाची लय बिघडली आहे. जर आपण पॉइंट टेबलवर नजर टाकली तर आरसीबी 10 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. बंगळुरूने इंडियन प्रीमियर लीगमध्ये 9 सामने खेळले आहेत ज्यात त्यांनी 5 जिंकले आहेत आणि 4 गमावले आहेत.
IPL 2022 मध्ये गुजरात टायटन्सची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. पॉइंट्स टेबलवर नजर टाकली तर हार्दिक पंड्याचा संघ 14 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. टायटन्सने 15 व्या हंगामात 8 सामने खेळले आहेत ज्यात 7 जिंकले आहेत आणि एक पराभूत झाला आहे. हा संघ प्लेऑफसाठी पात्र होण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. जर गुजरात टायटन्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धचा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला तर ते प्रथम प्लेऑफसाठी पात्र ठरतील.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन
गुजरात टायटन्स : रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद शमी.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेजलवुड, मोहम्मद सिराज.