
मुंबई – IPL 2022 च्या 42 व्या सामन्यात पंजाब किंग्जला लखनौ सुपर जायंट्स (PBKS vs LSG) विरुद्ध 20 धावांनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनौचा संघ केवळ 153 धावा करू शकला. पंजाबला हा सामना जिंकण्याची चांगली संधी होती, मात्र खराब फलंदाजीमुळे या संघाने आणखी एक सोपा सामना गमावला. पंजाबच्या पराभवानंतर चाहते त्याच्यावर भडकले.
पंजाबने आणखी एक सोपा सामना गमावला
आयपीएलमध्ये गेल्या काही वर्षांपासून आघाडीच्या संघाला 2 गुण देणे ही पंजाबच्या संघाची सवय झाली आहे. असाच काहीसा प्रकार शुक्रवारी लखनौ विरुद्धच्या सामन्यात घडला. 154 धावांचे सोपे लक्ष्य गाठण्यात या संघाला अपयश आले आणि अखेरीस 20 धावांनी सामना गमवावा लागला. पंजाब किंग्जचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 133 धावा करू शकला आणि सामना गमावला. या पराभवानंतर पंजाबच्या कामगिरीने सर्वांचीच निराशा झाली आहे.
चाहते संतापले
पंजाबच्या कामगिरीवर त्याचे चाहतेही प्रचंड नाराज आहेत. पंजाब टीमला ट्विटर आणि सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून पंजाबकडे अनेक दिग्गज खेळाडू आहेत, मात्र संघातील खेळाडूंच्या चुकीच्या निवडीमुळे हा संघ प्रत्येक वेळी निराश होतो. एका युजरने तर ट्विट करताना लिहिले की पंजाबचा संघ या दशकातील सर्वात वाईट संघ आहे.
कागिसो रबाडा (4/38) आणि राहुल चहर (2/30) यांच्या शानदार गोलंदाजीमुळे लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्ज समोर 20 षटकांत 8 बाद 153 धावा केल्या आणि पंजाब किंग्जसमोर154 धावांचे लक्ष्य ठेवले. लखनौ सुपर जायंट्ससाठी क्विंटन डी कॉक (46) आणि दीपक हुडा (34) यांनी 59 चेंडूत 85 धावांची शानदार भागीदारी केली. पंजाबकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक विकेट घेतल्या. मात्र कर्णधार मयंक अग्रवालसह सर्वच फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली.