DNA मराठी

IPL 2022: आयपीएलवर पुन्हा कोरोनासंकट?; दिल्लीच्या अडचणीत वाढ

0 230
IPL 2022: Fans angry over 'this' team; Said, in the last 10 years ..

मुंबई –  पुन्हा एकदा आयपीएलमध्ये (IPL 2022) कोरोना विषाणूचा (Corona) संकट निर्माण झाला आहे. त्यामुळे आयपीएलवर आता प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे.  दिल्ली कॅपिटल्स संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट (Patrick Farhart) यांना कोरोनाची लागण झाली आहे.

‘‘दिल्ली संघाचे फिजिओ फरहार्ट यांची कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. ते सध्या दिल्ली संघाच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत,’’ अशी माहिती ‘आयपीएल’ संयोजकांकडून देण्यात आली. दोन महिने चालणाऱ्या ‘आयपीएल’च्या १५व्या हंगामात करोनाची लागण झालेले फरहार्ट हे पहिले व्यक्ती आहेत.

शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दिल्लीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध सामना रंगणार आहे. मात्र, फरहार्ट यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे या सामन्याबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. शुक्रवारी फरहार्ट यांच्या चाचणीचा अहवाल सकारात्मक येताच दिल्ली संघातील सर्व खेळाडूंना अलगीकरणात ठेवण्यात आले. तसेच त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली. या चाचण्यांचा अहवाल शनिवारी सकाळी येणे अपेक्षित असून त्यानंतरच दिल्ली-बंगळूरु सामन्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे समजते.

गतवर्षीही मे महिन्यात ‘आयपीएल’च्या जैव-सुरक्षा परिघात कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे भारतीय नियामक मंडळाला (बीसीसीआय) हंगाम स्थगित करणे भाग पडले होते. त्यानंतर उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात आले. यंदा कोरोनाचा धोका कमी करण्याच्या उद्देशाने ‘बीसीसीआय’ने महाराष्ट्रातील चार स्टेडियमवर ‘आयपीएल’ सामने खेळवले आहेत. मुंबईतील वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम आणि गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियममध्ये हे सामने होत आहेत. मात्र, खबरदारी घेतल्यानंतरही आता पुन्हा ‘आयपीएल’च्या जैव-सुरक्षा परिघात करोनाचा शिरकाव झाल्याने ‘बीसीसीआय’ची चिंता वाढली आहे.

Related Posts
1 of 2,508
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: