13 जणांची फसवणूक करून गुंतवणूकदारांना थापड्याने घातला 64 लाखांचा गंडा

0 248

नाशिक –   नाशिक शहरात एका थापड्याने 13 जणांची तब्बल 64  लाख रुपयांची फसवणूक(Cheating) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून या प्रकरणात मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा  देखील दाखल झाला आहे. सध्या मुंबईनाका पोलिस या प्रकरणात आरोपी असलेला राहुल शंकर गौडा याचा शोध घेत आहे.  (Investors were slapped with Rs 64 lakh for cheating 13 people)

मिळालेल्या माहितीनुसार राहुल शंकर गौडा (वय 35, रा. बेळगाव, कर्नाटक) हा आपण अॅक्युमेन आणि गुडवेल (Acumen and Goodwell) या शेअर मार्केट (Stock market) कंपनीचे ब्रोकर असल्याचे सगळ्यांना सांगत असे. लोकांचा आपल्या बोलण्यावर विश्वास बसावा म्हणून त्याने वैद्यनगर भागातल्या सोसायटीत आपले कार्यालय थाटले होते. तिथे येणाऱ्या प्रत्येकाला तो गुंतवणुकीचे आमिष दाखवायचा.

लोकांचा आपल्यावर विश्वास बसावा म्हणून तो अॅक्युमेन आणि गुडविल कंपनीचे आपण शेअर ब्रोकर असल्याचे बनावट प्रमाणपत्र दाखवायचा. समोरच्याला विश्वासात घेत आपले म्हणणे पटवून द्यायचे कसब त्याच्याकडे होते. याच जोरावर त्याने 1 नोव्हेंबर 2020 ते 5 एप्रिल 2021 या काळात गुंतवणूकदारांचा विश्वास संपाद केला. एकूण 75 लाख 45 हजारांची रक्कम त्यांच्याकडून स्वीकारली.

तिसऱ्या पतीपासून विभक्त होणार ‘ही’ चर्चित अभिनेत्री, जाणून घ्या कारण

लोकांचा विश्वास बसावा म्हणून त्यातल्या 11 लाख 1597 रुपयांचा त्याने गुंतवणूकदारांना परतावा दिला. मात्र, त्यानंतर त्याने इतरांना पैसे द्यायला टाळाटाळ केली. शेवटी कंटाळून भगूर इथल्या देवळाली कॅम्पचे संजय सदानंद बिन्नर यांनी मुंबईनाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. बिन्नर यांच्यासह त्याने जवळपास 13 जणांना फसवल्याचे समजते. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक चंद्रकांत आहिरे करत आहेत. (Investors were slapped with Rs 64 lakh for cheating 13 people)

हे पण पहा  –उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांनी अडवला पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा ताफा | दादा मला पाच मिनिट वेळ द्या

Related Posts
1 of 1,603
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: